शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

67 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार रुपये बुडाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान याेजनेअंतर्गत ३१ मे या मुदतीत जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्याचे पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षीच्या सहा हजार रुपये मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये जमा केले जाते. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्ड व इतर कागदपत्रे जाेडून केवायसी करणे अनिवार्य हाेते. भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या याेजनेच्या लाभासाठी व शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. 

‘३१ मे’ ची होती डेडलाईनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली हाेती. या कालावधीत जिल्ह्यातील ६८ टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र ३२ टक्के शेतकरी वंचित आहेत.

एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांना पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यात सहा हजार रुपये दिले जातात. या याेजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना मिळेल.

५८३२ शेतकरी ठरले अपात्रदाेन लाख ११ हजार ७५२ शेतकऱ्यांपैकी पंतप्रधान किसान सन्मान याेजनेच्या लाभासाठी पाच हजार ८३२ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील १२६६, माेहाडी १४०२, तुमसर तालुक्यातील १०३५, लाखांदूर ५६५, लाखनी ५५१, पवनी ४४५ आणि साकाेलीतील ३६८ शेतकरी आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

केवायसीसाठी आधारला माेबाईल नंबर संलग्न करणे बंधनकारक हाेते. हे काम गावात कुठेही हाेत नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शहरात दाेन दिवस रांग लावली. यामुळे माेठी धावपळ झाली. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.- भुपेश गाढवे, सर्पेवाडा शेतकरी

आधारला माेबाईल नंबरची सक्ती या याेजनेतून हटविण्यात आली. परंतु, त्यानंतर चार दिवस या याेजनेची लिंकच उघडली जात नव्हती. रात्री दाेन वाजेपर्यंत जावून केवायसी केली. तेव्हा कुठे या याेजनेसाठी मी पात्र ठरलाे. - अनुप सपाटे, जांभाेरा शेतकरी

मुदतवाढ देण्याची मागणी

- पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे संकेतस्थळ अत्यंत संथगतीने सुरू हाेते. त्यातच चार दिवस संकेतस्थळ उघडतच नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता आली नाही.- जिल्ह्यातील ६७ हजार ९३ शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना