देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संदर्भात अद्ययावत व वस्तूनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी शासनाने आरोग्य सेतू अॅप विकसित केले असून वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात आजपर्यंत ६७ हजार ६२० नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे.कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ अॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही ही माहिती कळते. या अॅपमध्ये मोबाईल नंबर, ब्लुट्यूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्यावेळी सदर अॅप युजर्सना अलर्ट करतो. सदर अॅप अॅन्ड्राईड व आॅयकॉन या दोन्ही व्हर्जनवर आहे. या अॅपमध्ये कोरोनाची लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सेंटर नंबर दिले आहे. केंद्र सरकारने सदर आरोग्य सेतू अॅप लाँज केल्यानंतर आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात ६७ हजार ६२० नागरिकांनी सदर अॅपला पसंती दिली आहे. सदर अॅप सर्वांनी आपल्या अॅन्ड्राईड मोबाईलवर आरोग्य सेतू या नावाचे प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून आपल्याबद्दल असलेले संपूर्ण माहिती अचूक भरण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.५०४ पोलिसांची आरोग्य तपासणीकोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात ५०४ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील १३५, पवनी ६४, तुमसर ८०, मोहाडी १०१, साकोली ७५, लाखांदूर २० व लाखनी तालुक्यातील २९ जणांचा समावेश आहे.
६७ हजार नागरिकांनी केले ‘आरोग्य सेतू’ डाऊनलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ अॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही ही माहिती कळते. या अॅपमध्ये मोबाईल नंबर, ब्लुट्यूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्यावेळी सदर अॅप युजर्सना अलर्ट करतो.
६७ हजार नागरिकांनी केले ‘आरोग्य सेतू’ डाऊनलोड
ठळक मुद्देकोरोना : अॅप डाऊनलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन