शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६६६ शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: February 16, 2017 00:18 IST

जून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या यादीसाठी धावपळ सुरु : अतिवृष्टीचा लाभ, २३ गावांचा समावेश देवानंद नंदेश्वर भंडाराजून ते आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली या दोन तालुक्यातील गारपीटग्रस्त ६६६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला गतवर्षीच्या खरीप हंगामात अस्मानी संकटाने घेरले होते. अतिवृष्टीमुळे हलके व मध्यम धान कापणीला आले असताना काही ठिकाणी धान सडले. काही ठिकाणी वादळी वारा व पावसामुळे धानपिक भुईसपाट झाले होते. अनेक वर्षांपासून ओला आणि कोरडा दुष्काळाची झळ सोसत शेतकरी मोठ्या आशेने खरीप पिकाची लागवड करीत असते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जून महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी लांबली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत पावसाने हजेरी लावली. निसर्ग कोपामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीक राहीली. आॅक्टोंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवनदान तर काही शेकऱ्यांसाठी मारक ठरला. अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. जून ते आॅक्टोंबर या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील २०९.०६ हेक्टर आर शेतजमिन बाधीत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला. या अहवालानुसार जिल्ह्यातील मोहाडी व साकोली तालुक्यातील २३ गावे अतिवृष्टीने बाधित झाले. याचा ६६६ शेतकऱ्यांना फटका बसला. यात मोहाडी तालुक्यात ३ गावामधील ३२ तर, साकोली तालुक्यात २० गावातील ६३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने जून ते आॅक्टोंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानीवर मदत जाहीर करण्याचा निर्णय ९ जानेवारी रोजी घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा उतरविलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषानुसार संबंधित विमा येत्रणेमार्फेत मदत देण्यात येणार आहे. त्या रकमेच्या ५० टक्के रक्कम पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याकरिता पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना १३ मे २०१५ मधील तरतुदीनुसार देय असणारी रक्कम ५०० रुपये प्रती हेक्टरीपेक्षा कमी येत असले, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर करण्यात यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला शेतकऱ्यांची यादी तात्काळ मागविली आहे.