शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात अंत्योदयच्या ६६,१०४ हजार कार्डधारकांना मिळणार मोफत साडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 14:52 IST

राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा होणार पुरवठा : होळीपर्यंत होणार स्वस्त धान्य दुकानातून वितरण

- देवानंद नंदेश्वर 

भंडारा : राज्य शासनाने जिल्ह्यातील ६६ हजार १०४ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून यासाठी शासनाकडे एवढ्या साड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून २३ जानेवारीला यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला आदेश देण्यात आले आहेत. रेशन दुकानातून प्रजासत्ताक दिन ते होळी अर्थात २४ मार्च या काळात या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रतिकार्ड एक साडी मोफत दिली जाणार आहे.

राज्य यंत्रमाग महामंडळाव्दारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठठे तयार करून प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचविण्यात येणार आहेत. या सर्व बाबींची ऑनलाइन नोंद ठेवली जाणार आहे.

पाच वर्षांसाठी आहे योजना२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दरवर्षी प्रतिकुटुंब ३५५ रुपये किमतीची एक साडी मोफत दिली जाणार आहे. राज्यात जवळपास २४.५८ लाख कुटुंबांकडे अंत्योदय कार्ड असल्याने त्यांना याचा राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा लाभ मिळणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातून मिळणार साडीअंत्योदय कार्ड असलेल्या कुटुंबांतील महिलेला दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. साड्यांचे वितरण स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्यासह आता साडीचेही वितरण होणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. यांसदर्भातील नियोजन पुरवठा विभागाकडून केले जात आहे. होळीच्या सणापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका एक याप्रमाणे वितरण केले जाणार आहे.- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी