शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

५,७६८ रुग्णांनी घेतला जन आरोग्य योजनेचा लाभ

By admin | Updated: July 1, 2017 00:28 IST

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा (जुनी राजीव गांधी जीवनदायी योजना) जिल्ह्यातील ५ हजार ७६८ रुग्णांनी लाभ घेतला आहे.

१७ कोटी १६ लक्ष रुपये मंजूर : गंभीर आणि किरकोळ ९७१ आजारांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा (जुनी राजीव गांधी जीवनदायी योजना) जिल्ह्यातील ५ हजार ७६८ रुग्णांनी लाभ घेतला आहे. यासाठी शासनाने १७ कोटी १६ लक्ष ५१ हजार रुपये मंजूर केले आहेत. या योजनेत ९७१ गंभीर आणि सर्वसाधारण आजारांचा समावेश आहे.भंडारा तालुका- १६४६, लाखांदूर तालुका- ४३६, लाखनी तालुका-७११, मोहाडी तालुका- ७३९, पवनी तालुका- ७९०, साकोली तालुका- ५९६ व तुमसर तालुक्यातील ८५० रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी शासनाव्दारे विमा कंपनीमार्फत १७ कोटी १६ लाख ५१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सामान्य माणसाला आरोग्य सेवा देणारी ही अतिशय चांगली योजना आहे.या योजनेकरीता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय अन्न योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटूंबे असणे आवश्यक आहे. या योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक प्रती कुटुंब १ लाख ५० हजार पर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २.५० लाख पर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत रुग्णालयातील खाटा, शस्त्रक्रीया, भूल सेवा, तज्ञ डॉक्टाच्या सेवा, निदान सेवा, शुश्रुषा सेवा, आवश्यक औषधी, मोफत भोजन, एक वेळचा परतीचा प्रवास पात्र असणाऱ्या कुटूंबाना महाराष्ट्रात कोठेही नोंदणीकृत असणाऱ्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेवू शकतात.या योजनेमध्ये अतिगंभीर असे मेंदू, हृदय, यकृत, किडनी, अस्थिरोग, जन्मजात विकृती, कर्करोग, लहान मुलाचे आजार, डायलिसीस इत्यादी आजारावर उपचार केले जातात. रुग्णास या योजनेचा लाभ घेण्याकरीता मूळ शिधापत्रिका व शासनमान्य ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड) नोंदणीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या योजनेच्या आरोग्यमित्रांकडे दाखवून नोंदणीकृत करुन घेणे आवश्यक आहे. गंभीर रुग्णाकरीता तातडीच्या प्रसंगी भरती झाल्यास ७२ तासांमध्ये आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.भंडारा जिल्हयामध्ये एकूण चार रुग्णालयाचा या योजनेत समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, नाकाडे हॉस्पिटल व रंगारी हॉस्पिटल भंडारा. रुग्णांच्या सोयीकरीता व अडीअडचणीच्या वेळी मदतीकरीता नि शु:ल्क दूरध्वनी सेवा आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचे कार्यालय महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, पहिला मजला, रुग्णालय उपहार गृहावर, एन.एस.व्ही. बिल्डींग जिल्हा रुग्णालय भंडारा येथे आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे.