शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

५३ हजार बालकांना आधारची प्रतीक्षा

By admin | Updated: May 1, 2015 00:46 IST

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराशून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८५ हजार ५५४ बालकांपैकी सुमारे ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले. अद्यापही ५३ हजार १५ बालकांना आधार नोंदणीची प्रतीक्षा आहे.शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकही स्वत:हून आधार कार्ड काढत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख एवढी आहे. त्यापैकी ८९ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शासनाने ० ते पाच या वयोगटातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून सुरू केली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील आधार केंद्रांवर २९ यंत्र सुरू आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद असल्याने २८ मशीनवर कामे केली जात आहेत. जिल्हाभरात ० ते पाच या वयोगटातील ८५ हजार ५५४ बालके आहे. त्यापैकी आजपर्यंत ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. संपूर्ण बालकांचे जून महिन्यापर्यंत आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १00 टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंगणवाडीतील बालकांचेही आधार कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोहयो मजुरांचे जॉब कार्ड काढण्याची प्रक्रीयाही अद्यापही सुरु आहे. त्यामुळे आतापर्यत केवळ ३८ टक्के बालकांची आधार कार्ड काढण्यात आले. लवकरच उर्वरीत बालकांचे आधार कार्ड काढण्यात येतील.- प्रतापसिंग राठोड,उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग)आधार कार्ड काढण्याची मोहीम ग्रामीण भागात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले नाही. परिणामी त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावी आधार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या गावातील बालकांसोबतच इतरही नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. मात्र यामध्ये प्रथम प्राधान्य बालकांनाच दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबद्दल निर्देश नाहीअंगणवाडीतील बालकांसोबतच पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावे लागणार आहेत. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक बालकाला आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र महिला बालकल्याण विभागाला प्राप्त झाले नाही.