शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

औषध कारखान्यात ५० टन लाकडे जप्त

By admin | Updated: January 13, 2015 22:54 IST

विना परवानगी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांना वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ही लाकडे देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीत बॉयलर प्रज्वलनाकरिता

बॉयलर प्रज्वलनाकरिता उपयोग : तुमसर वन विभागाची कंत्राटदारावर कारवाई तुमसर : विना परवानगी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांना वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ही लाकडे देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीत बॉयलर प्रज्वलनाकरिता उपयोगात आणली जात होती. ५० टन लाकडांचे ठोकडे वनअधिकाऱ्यांनी जप्त केली. या प्रकरणात लाकूड कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली. कंपनी व्यवस्थापकांचे बयाण नोंदविण्यात आले. या लाकडांची किंमत दीड लाखाच्या वर आहे. तुमसर वनविभागाला गुप्त माहितीच्या आधारावर अवैध लाकडे वाहून नेणाऱ्या वाहनाबाबद माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वनअधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. तुमसर हद्दीत २ जानेवारी रोजी देव्हाडी शिवारात एका धर्मकाट्यावर पीकअप गाडी क्रमांक एम.एच.१५ डीके ३३११ वजन करतांनी पकडली. वनअधिकाऱ्यांनी लाकूड वाहतुकीचा परवाना लाकडे कुठून आणली त्याचा पुरावा (टिपी) कागदपत्रे सादर करण्यास सांगितली. तेव्हा चालकांची तारांबळ उडाली. वनअधिकाऱ्यांनी हे वाहन तुमसर वनकार्यालयात जमा केले. ३ जानेवारीला पुन्हा संबंधित लाकूड कंत्राटदाराच्या दुसऱ्या वाहनाची माहिती प्राप्त झाली. हे वाहन बोरी गावाजवळ आडमार्गाने वेगाने जाताना अधिकाऱ्यांनी रोखले. पीक अप व्हॅन क्रमांक एम.एच. १५ डीके ७९०६ रंगेहात पकडले. या दोन्ही वाहनात लाकूड कंत्राटदार रामेश्वर गंगाराम मोटघरे (३०) रा.चुल्हाड यांची लाकडे होती. कंत्राटदार मोटघरे याने बयाणात देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीला लाकडांचे ठोकडे विक्री केल्याची कबुली दिली. विना परवानगीने अवैध लाकूड वाहतूक केल्याबाबत भारतीय वनअधिनियम १९२७ कलम ४१ अंतर्गत कारवाई करण्यात आली. कंपनी व्यवस्थापक त्रिलोकी सिंह यांनी आपल्या बयाणात रामेश्वर मोटघरे यांच्याकडून लाकडे खरेदी केली. त्याचे रितसर बिल त्याने दिले होते. लाकडे कुठून आणले याबद्दल आम्हाला माहिती नव्हती असे बयाणात सांगितले.चुल्हाड परिसरातील शेतावरील लाकडे येथे कापण्यात आली होती. त्या लाकडांना सिहोरा येथील ओंकार आरा मशीनवर लाकडाचे तुकडे करण्यात आले. त्या आरा मशीनवरही कारवाई करण्यात येईल असे वनअधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यात हिवर, पळस, कडू लिंब, मोह, बाभूळ, साजा, किन्ही या लाकडांचा समावेश आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एस.यु. मडावी यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक बी.डी. चोपकर, गस्ती पथकाचे वनपाल एन.के. तलमले, बीट रक्षक ए.डी. राऊत यांनी केली. सहाय्यक वनसंरक्षक डी.जी. लुटे यांनी दि. २ जानेवारी रोजी भेट देऊन लाकडांचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)