शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

५० कोेटींचे चुकारे अडले

By admin | Updated: August 15, 2015 01:00 IST

जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी गतवर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे धान खरेदीत घट झाली आहे.

शेतकरी डबघाईस : जिल्ह्यात १०६ कोटींची ७.८० लाख क्विंटल धान खरेदीलोकमत विशेषदेवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी गतवर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे धान खरेदीत घट झाली आहे. यावर्षांत एकूण ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ १०६ कोटी १९ लाख ८४ हजार रूपयांची धान खरेदी झाली असून शेतकऱ्यांचे ५० कोटी २ लाख ४४ हजार रुपयांचे चुकारे अडले आहे.भंडारा जिल्ह्यात मागील खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मिळेल त्या आशेने शेतकऱ्यांनी धानाचे चुरणे केले़ मात्र यावर्षी सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे जिल्ह्यात १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यात ५२ धान खरेदी केंद्र उघडण्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र ४९ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४०० रूपये तर साधारण प्रतिच्या धानाला १,३६० रुपये आधारभूत किंमत देण्यात आली. १ आॅक्टोंबर २०१४ ते ३० जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात २४ हजार ५२५.८५, मोहाडी तालुक्यात ६० हजार ८२२.८५, तुमसर तालुक्यात १ लाख २३ हजार १४०.३९, लाखनी तालुक्यात १ लाख ६९ हजार २५३.५५, साकोली तालुक्यात १ लाख २९ हजार ६५३.४०, लाखांदूर तालुक्यात १ लाख ९५ हजार ७५४.८० तर पवनी तालुक्यात ७७ हजार ४६४.६० क्विंटलचा समावेश आहे.भरडाईनंतर १.३५ क्विंटल धान शिल्लकसन २०१४-१५ मध्ये भंडारा १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ यातील सहा लाख ४५ हजार ५८९.४० क्विंटल धान भरडाईसाठी ४४ मिलर्सना देण्यात आली. प्रत्यक्षात सहा लक्ष ३८ हजार ८०९.३५ क्विंटल धानाची भरडाई झाली. यात ६ हजार ७८०.१० क्विंटल धान भरडाईत घट निर्माण झाली. सध्या १ लाख ३५ हजार २६.०४ क्विंटल धान गोदामात शिल्लक आहे. एकूण झालेल्या ६ लाख ४५ हजार ५८९ धानभरडाईनंतर ६७ टक्के प्रमाणे प्रस्तावित चार लाख २८ हजार २.२३ क्विंटल तांदूळ मिळाला असून एफसीआयकडे ४ लाख ९ हजार ७५.२६ क्विंटल तांदूळ जमा करण्यात आलेला आहे. यावर्षी धान भरडाईसाठी मिलसमध्ये वाढ झाली आहे. १०६.१९ कोटींची धानखरेदीजिल्ह्यात १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ यात ८ हजार ६८२ क्विंटल धान अ ग्रेड, तर ७ लाख ७१ हजार क्विंटल साधारण धानाचा समावेश आहे. एकूण १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची खरेदी कण्यात आली. त्या रक्कमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये १२२ कोटी २७ लाख ७० हजार ७५३ रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली आहे़ शेतकऱ्यांना धानाचा मोबदला म्हणून ७२ कोटी २५ लाख २६ हजार ३४८ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली़ ५० कोटी २ लाख ४४ हजार ४०५ रुपयांचे चुकारे अडले़बोनस वितरण थंडबस्त्यातआधारभूत धान केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रती क्विंटल २५० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. त्यानंतर बोनसपोटी ३ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती आहे. परंतु बोनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. धानाचे चुकारे व बोनस केव्हा मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांनाच अडचणीत आणले आहे.