शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरातील ४८ गावांची धुरा ३३ पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास ...

ठळक मुद्देकामाचा ताण : लाखांदूर ठाण्यात कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.या पोलीस स्टेशनला एक पोलीस निरीक्षक, ५ साहाय्यक, उपनिरीक्षक व ७८ पोलीस असा एकून ८४ पोलीसांचे मनुष्यबळ शासन दरबारी आहे. येथील लोकसंख्या पाहता कमीत कमी २५० ते ३०० पोलिसांची गरज आहे. परंतु या ठिकाणी सध्या ४००० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. तालुक्यात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़.वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणा?्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़. १ लाख ३६ हजार लोकसंख्या असलेल्या या ४८ गावात पोलिसांची संख्या मात्र ३३ इतकीच आहे़ त्यामुळे याठिकाणी घडणा?्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे.त्याचाच परिणाम म्हणून घरफोडी, विनयभंग व अवैद्य धंद्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.सध्या ४०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी कमीतकमी २५० ते ३०० पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे.पोलिसांची संख्या ३०० वर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.सद्यास्थितीत लाखांदुर तालुक्यात अवैद्य दारू विक्री, सट्टा, जुगार, आँनलाईन सट्टा, घरफोडी, दारू पुरवठा यासह विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियत्रंण ठेण्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.