४९ बालक कुपोषित : ७५ हजारांपैकी ७४,७३० बालकांचे केले वजनप्रशांत देसाई भंडारामहिला व बाल विकास सेवा योजनेच्या अखत्यारित जिल्ह्यात १ हजार ३०५ अंगणवाडी केंद्र आहेत. यात ७५,०३४ बालक शिक्षण घेत असून ७४,७३० बालकांची वजन घेण्यात आलेली आहे. यातील ४८९ बालक तीव्र कमी वजनाची आहेत. भंडारा तालुक्यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाची १०० तर तुमसर तालुक्यात सर्वात कमी ४७ बालकांचा समावेश आहे. ४९ बालक कुपोषणाच्या विळख्यात असल्याची गंभीर बाब सदर विभागाच्या जूनअखेरच्या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी बालकांवर संस्कार दिले जाते. यासाठी जिल्ह्यात १,१९६ अंगणवाडी केंद्र तर १०९ मिनी अंगणवाडी असे १ हजार ३०५ अंगणवाडी केंद्र चालविली जात आहेत. यात ७५ हजार ३४ बालक सर्वेक्षित (नोंद) आहेत. जून महिन्याच्या अखेरचा अहवाल महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाने बनविला असून यात ७४ हजार ७३० बालकांचे वजन घेण्यात आलेले आहे. त्यात ४९ बालक कुपोषणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.४८९ बालक तीव्र कमी वजनाच्या (एसयुडब्ल्यु) क्षेणीत आहेत. तर २७२ बालक मध्यम तीव्र कुपोषणाच्या क्षेणीत आहे. सर्वसाधारण क्षेणीत ७० हजार ८९४ बालकांचा समावेश आहे. तर ३ हजार ३४७ बालक कमी वजनाच्या श्रेणीत आहेत. कुपोषणाच्या विळख्यात सापडलेली सर्वाधिक १० बालक लाखांदूर व पवनी तालुक्यात आहेत. तर तीव्र कमी वजनात सर्वाधिक १०० बालक भंडारा तालुक्यात तर सर्वात कमी ४७ सर्वात कमी बालक तुमसर तालुक्यात असल्याचीही नोंद या अहवालात नमूद आहे. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी पोषण चळवळीच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे. यातून संपूर्ण कुटुंब कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिने सक्षम होईल. - पी. डी. राठोड,उप मुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बाल विकास)
४८९ बालके अत्यल्प वजनश्रेणीत
By admin | Updated: July 28, 2016 00:26 IST