शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ४६५ शाळा मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्यावतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा इमारतींना दुरूस्ती अभावी अखेरची घरघर लागली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्यावतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा इमारतींना दुरूस्ती अभावी अखेरची घरघर लागली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर आले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात असलेल्या ४६५ शाळा मोडकळीस आल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नको, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे शाळा दुरूस्ती प्रस्तावाला आचारसंहितेमुळे शाळा दुरूस्ती प्रस्तावाला अद्याप मंजुरीही नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग आता निवडूून येणाऱ्या नव्या मंत्रीमंडळाकडे डोळे लावून बसला आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत ११४७ शाळा येतात. यात जिल्हा परिषदेच्या ७९७, नगरपरिषद २२, शासकीय (समाजकल्याण/ आदिवासी) शाळा ३, अनुदानित (खाजगी) शाळा ३२५ चा सामवेश आहे.जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यात इमारती ना दुरूस्तीचे प्रमाणही जास्त आहे. त्यातील बहुतांश शाळा इमारती ५० वर्षापुर्वींच्या आहेत. अशा स्थितीत शाळांची पातळीने दुरूस्ती होणे गरजेचे आहे. मात्र दोन वर्षांपासून शाळा दुरूस्ती होत नसल्याने शाळांची हालत खस्ता झाली आहे. मागील वर्षी शाळा दुरूस्तीसाठी प्रस्ताव ठेवून सीएसआर मेळावा यासाठी मागणी केली होती. मात्र भंडारा जिल्ह्यात त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. काही प्रमाणात शाळा दुरूस्ती व वर्ग कामे झाली. आता ज्या शाळांची दुरूस्ती शिल्लक आहे त्यांची समस्या इतकी गंभीर झालेली आहे की, त्यासाठी लागणारा एकूण निधी १५० कोटी रूपयांच्या घरात पोहचला आहे. गत महिन्यात ४६५ शाळा दुरूस्तीचा प्रस्ताव सर्व शिक्षा अभियान कक्षाद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.सध्या आचारसंहिता असल्याने शाळा दुरूस्तीच्या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. निधी मिळेपर्यंत पावसाळा अर्ध्यावर आलेला असेल. यात नादुस्त झालेल्या शाळांची अवस्था बिकट झालेली असून यामुळे या नादुरूस्त शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जबाबदारी कोण घेणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुरुस्तीसाठी १५० कोटींचा प्रस्तावजिल्ह्यातील ४६५ शाळांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी १५० कोटी रूपयांची मागणी केलेली आहे. लवकरच निधी प्राप्त झाल्यानंतर शाळा दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात येईल. काही शाळांची डागडूजी किरकोळ स्वरूपाची असली तरी वेळेत दुरूस्ती होणे गरजेचे असल्याचे सर्व शिक्षा अभियानाकडून सांगण्यात आले.