शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

जिल्ह्यात ४५ टक्के रोवणी

By admin | Updated: August 1, 2014 00:08 IST

गत १५ दिवसात पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यात अजूनपावेतो ४५ टक्के रोवणी झाल्याची माहिती आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ४० इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा

पावसाची प्रतीक्षा : उशिरा रोवणीमुळे उत्पादन घटण्याची शक्यतांभंडारा : गत १५ दिवसात पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यात अजूनपावेतो ४५ टक्के रोवणी झाल्याची माहिती आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ४० इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही असे तज्ज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भंडारा जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. भंडारा जिल्ह्यात धानाची रोवणी ४५ टक्क्याच्या आसपास आटोपली आहे. गत दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रोवणीचे मंदावले आहे. ज्यांच्याकडे पाण्याची किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिथे मात्र रोवणीचे काम जोमात सुरु आहे. कडधान्यामध्ये भूईमुग, तिळ, सोयाबीन व इतर गळीत धान्याची लागवड केली जात आहे. त्याचप्रकारे पाच हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील एकुण १ लक्ष ९८ हजार ६३९ क्षेत्रात धानासह अन्य पिकांची लागवड केली जाते. यापैकी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील दोन्ही कृषी उपविभागांतर्गत ७८ हजार ६१० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. याची एकुण टक्केवारी ३९.५७ इतकी आहे. भंडारा तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्र ४३९१ क्षेत्र मोहाडी १२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्र, तुमसर ७११८ हेक्टर, पवनी २० हजार २६४ हेक्टर, सकोली ८ हजार ४२३ हेक्टर, लाखनी १० हजार ५७१ हेक्टर, लाखांदूर १५ हजार ९९९ क्षेत्र ऐवढे आहे. पावसाच्या हजेरीवर धान पऱ्हे लागवडीची गती अवलंबून राहणार आहे. बळीराजाला पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या दरम्यान येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने वर्तविला आहे. यंदा उशिरा सुरू झालेल्या रोवणीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ज्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी पावसापूर्वी विहीरीच्या पाण्याने रोवणी केली, त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)