शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१० वर्षांत ४४ खून

By admin | Updated: August 24, 2015 00:42 IST

तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत मागील १० वर्षांमध्ये ४४ खून झाले. सर्वाधिक ११ खून सन २०११ मध्ये झाले होते.

तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत प्रकार : सुपारी किलरचा वाढतोय ट्रेंडतुमसर : तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत मागील १० वर्षांमध्ये ४४ खून झाले. सर्वाधिक ११ खून सन २०११ मध्ये झाले होते. यातील दरोडा प्रकरणातील तिहेरी हत्याकांड राज्यात गाजले होते. सन २००९ ते २०१३ पर्यंत २२ खून झाल्याची नोंद आहे. ‘सुपारी किलर’कडून खून करण्याची पद्धत शहरात डोके वर काढू पाहत आहे.तुमसर शहराची तांदूळ तथा कुबेरनगरी अशी ओळख आहे. राज्य महामार्ग, आंतरराज्यीय महामार्ग तथा मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यापार तांदूळ, मॅग्नीज खाणीसह सराफा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिक कारखाने बंद अवस्थेत आहे. नागपूर तथा गोंदिया या दोन प्रमुख शहराशी येथील नागरिकांचे ये-जा आहे.मागील १० वर्षात शहर अशांत झाल्याचे दिसून येते. सन २००५ ते २०१५ दरम्यान एकूण ४४ खुनांची नोंद येथे झाली आहे. कोणताही सुज्ञ माणूस तथा पोलीस प्रशासनाची नक्कीच झोप उडविणारा आकडा आहे, परंतु पोलीस विभागाने ही बाब गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.तुमसर ठाण्यांतर्गत सन २००५ मध्ये ७ खून, २००६ मध्ये ५, २००७ मध्ये ४, २००८ मध्ये ३, २००९ मध्ये ३, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ११, २०१२ मध्ये १, २०१३ मध्ये ३, २०१४ मध्ये २, सन २०१५ मध्ये १ असे एकूण ४४ अशी आकडेवारी आहे. यात काही खुनात सुपारी किलरची मदत घेण्यात आली होती. सोनी परिवारातील तिघांच्या हत्येचे प्रकरण राज्यात गाजले होते. यातील काही आरोपी नागपूर येथील होते. यातील काही खून पूर्व वैमनस्यातून घडले हे येथे उल्लेखनीय.तुमसर हे शांत शहर म्हणून ओळखले जाते. मागील काही वर्षांपासून शहरात टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळींचा भडका येथे उडतांनी दिसतो. शहराची लोकसंख्या ४२ हजार आहे. शहर जुने असून तितकीच त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.तुमसर शहरात मागील ८ ते ९ वर्षापासून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत आंधळगाव, मोहाडी, तुमसर, सिहोरा व गोबरवाही ही पोलीस ठाणी येतात, परंतु या कार्यालयामुळे विशेष असा फरक पडलेला दिसून येत नाही. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.मागील १० वर्षात खूनाची आकडेवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बुरडे यांना मागीतल्यावर त्यांनी अशी अधिकृत आकडेवारी देता येत नाही. याकरिता माहितीचा अधिकार अंतर्गत रितसर अर्ज करा असे सांगून मी नव्याने तुमसर येथे रूजु झालो आहे अशी पुस्ती जोडली. दि. १२ आॅगस्टला सकाळी ६.३० दरम्यान राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर पिस्तुल तथा शस्त्रनिशी प्राणघातक हल्ला झाला. येथे सुपारी किलरचे नाव पुढे आले. आता लहान शहरातील हा ट्रेंड सुरु झाल्याचे दिसते. येथील काहींची मुंबईतील अंडरवर्ल्डसारखी टोपण नावे आहेत, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)