शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४२ गावांची मदार २० पोलीसदादांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते.

ठळक मुद्देगुन्हेगारीचा वाढतोय आलेख : कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ४२ गावे येतात. पवनी, शिरूड, धोत्रा, एकुर्ली, कानगाव, अलमडोह, येरणवाडी, टाकळी, नांदगाव, भगवा व अन्य गावांचा समावेश आहे. ठाण्याकरिता तीस कर्मचारी मंजूर असताना केवळ वीस पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते. कामाच्या ताणामुळे त्यांची प्रचंड दमछाक होत असून याचाच परिणाम गावासह परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण तीन बीट आहेत. तळेगाव, कानगाव, अल्लीपूर ही मोठी गावे असून जमादारांना त्या-त्या बीटची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन गावांकरिता केवळ सहा पोलीस कर्मचारी आहेत.गावासह परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ आहे. मात्र, अपुºया असलेल्या कर्मचाºयांना याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी केवळ एक ते दोन कर्मचारी गस्तीवर असतात. मोठी घटना घडली तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे या कर्मचाºयांना शक्य नाही. याकरिता ठाण्यात पुरेसा कर्मचारीवर्ग गरजेचा आहे. अल्लीपूर हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असुन संवेदनशील म्हणून या गावाची पोलीस विभागात नोंद आहे. याकरिता येथे पुरेसे पोलीस कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कामाच्या ताणामुळे कौटुंबिक सोहळ्यातही अनुपस्थितीकायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. याकरिता हा विभाग मनुष्यबळाने परिपूर्ण असे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठाण्यात अपुरा पोलीस कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो. यामुळे पोलिसांना कौटुंबिक सोहळ्यातही सहभागी होता येत नाही. पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.अल्लीपूर आणि परिसराची लोकसंख्या मोठी आहे. मात्र, ठाण्यात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे.- योगेश कामाले, ठाणेदार अल्लीपूर

टॅग्स :Policeपोलिस