शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४२ आंतरजातीय जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 17, 2015 01:09 IST

जाती निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु समाजकल्याण विभागातर्फे मंजूरीप्राप्त ४२ जोडपी या अनुदानापासून वंचित आहेत.

देवानंद नंदेश्वर भंडाराजाती निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु समाजकल्याण विभागातर्फे मंजूरीप्राप्त ४२ जोडपी या अनुदानापासून वंचित आहेत. सन २०१३-१४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील ८४ जोडप्यांचे अर्ज मंजूर करुन त्यांना अनुदान वितरीत करण्यात आले. यात तीन जोडप्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे, उर्वरीत ८१ जोडप्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे असे ४०.९५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यातील ९८ जोडप्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. त्यापैकी ५४ जोडप्यांना २७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. दोन नवविवाहितांचा मृत्यू झाल्यामुळे अनुदान वाटप प्रक्रियेसंदर्भात आयुक्तांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. उर्वरित ४२ जोडपी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे २१ लाख रुपये वाटप व्हायचे आहेत.राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या योजनेअंतर्गत समित्यांना गावात लोकोपयोगी, समाजोपयोगी व जातीय निर्मूलन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या मोहीमेला लोकचळवळीचे स्वरुप आल्यामुळे गावकऱ्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा राखण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या आंतरजातीय विवाह योजना तंटामुक्त गाव समिती यशस्वीरित्या राबवित आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला समाजकल्याण विभागातर्फे ५० हजार रु पये अनुदान दिले जाते. भंडारा जिल्ह्यात तंटामुक्त गाव समितींनी घडवून आणलेल्या आंतरजातीय विवाहबध्द जोडप्यांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. समाज कल्याण विभागाच्या जागृतीअभावी या दाम्पत्यांना मदत मिळाली नाही. सामूहिक विवाह सोहळयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना कन्यादान योजनेंतर्गत ११ हजार रुपये दिले जाते. मात्र ही जोडपी तंटामुक्त समित्यांकडे विवाहबध्द झाल्यास त्यांना मदत मिळत नाही. यासाठी तंटामुक्त समित्यांनी विवाहबध्द जोडप्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागात अर्ज करणे गरजेचे आहे. मात्र तंटामुक्त समित्यांचा उदासिनतेमुळे विवाहबध्द जोडपी लाभापासून वंचित आहेत.