शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

जिल्ह्यात ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७२८ व्यक्तींपैकी ३८०२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचा दर ६६.३८ टक्के : जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची तपासणी त्यात ५७२८ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी ४० हजार ८५७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात ५७२८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. तर रुग्ण बरे होण्याचा रेट ६६.३८ टक्के असून मृत्यू दर २.१८ टक्के आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४० हजार ८५७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७२८ व्यक्तींपैकी ३८०२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. नागरिकही आता कोरोनाबाबत जागृक झाले असून संसर्ग टाळण्यासाठी स्वत:हून विविध उपाययोजना करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एक लाख १९ हजार ८८४ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला असून त्यामाध्यमातून कोरोनाबाबत इतंभूत माहिती मिळत आहेत. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत गावागावात तपासणी मोहीम राबविली जात आहे.डबलींग रेट २१.५०जिल्ह्यात कोरोना रुग्ण डबल होण्याच्या रेट २१.५० दिवस आहे. साधारणत: २१ दिवसात जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होत असल्याचे दिसून आले आहे. इतर जिल्ह्याच्या मानाने हा रेट समाधानकारक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असून त्याचे हे यश मानले जात आहे.शुक्रवारी १३९ व्यक्ती पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यूजिल्ह्यात शुक्रवारी १३९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुक्यातील ७७, साकोली १५, तुमसर ८, मोहाडी १३, पवनी १७, लाखनी ९ रुग्णांचा समावेश असून लाखांदूर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २९६४ झाली आहे. शुक्रवारी २४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात भंडारा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष आणि पवनी तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला.मृत्यूदर २.१८ टक्केजिल्ह्यात आतापर्यंत १२६ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यूदर २.१८ टक्के आहे. मृत्यू दर आटोक्यात असून मृत्यू झालेले बहुतांश रुग्ण हे उशिरा निदान झालेले आहेत. वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बहुतांश व्यक्ती अवघ्या ७२ तासात मृत्यूमुखी पडल्यात. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या