शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

३८ ट्रक चालक मालकांवर कारवाई

By admin | Updated: June 10, 2016 00:55 IST

भंडारा जिल्ह्यात राजरोसपणे रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रथमच जिल्ह्यात एकाचवेळी ३८ ट्रकचालकावर कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकरण रेती चोरीचे : तलाठी यांची पोलिसात तक्रारवरठी : भंडारा जिल्ह्यात राजरोसपणे रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रथमच जिल्ह्यात एकाचवेळी ३८ ट्रकचालकावर कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई बेटाळा घाटावरून अवैध रेती वाहतुक करणाऱ्या मिनाक्षी रामटेके यांच्या तक्रारीवरून वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत भादंवी ३७९, १८६ व १०९ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तहसीलदार भंडारा यांच्या आदेशान्वये तलाठी मिनाक्षी रामटेके हे दाभा तपासणी नाक्यावर सकाळी ८ ते २ दरम्यान कर्तव्यावर हजर होते. उपरोक्त कालावधीत या नाक्यावरून रेती भरून जाणाऱ्या ट्रकची तपासणी करून आवश्यक कागदपत्र आणि क्षमतेपेक्षा जास्त लोड वाहतुक तपासणीची जबाबदारी बजावत असतात. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनानी तपासणी करीता वाहन न थांबवता पळून गेले. तपासणी न करता पळून जाणाऱ्या ३८ ट्रकविरूद्ध कारवाई करण्याच्या संदर्भात तलाठी यांनी वरठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गौण खनिज रेतीची अवैध वाहतुक करून शासकीय मालमत्तेची चोरी केल्यामुळे ट्रक चालक व मालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रत्येक ट्रकमध्ये ३ ब्रास रेती असे एकूण ११४ ब्रास रेती घटनेच्या दिवशी चोरी झाली असून यांची शासकीय नियमानुसार अंदाजे २ लक्ष २८ हजार रूपये किंमत आहे. तलाठी यांच्या तक्रारी वरून ३८ ट्रकविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने करीत आहे. (वार्ताहर)