शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

३७१ गावे दुष्काळाची केवळ घोषणाच!

By admin | Updated: March 31, 2016 00:49 IST

मागील पाच वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात

मदतीची अपेक्षा : संकेतस्थळावर शासन निर्णयच नाहीभंडारा : मागील पाच वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करून या संदर्भातील उपाययोजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे; मात्र ही केवळ घोषणाच असून, अजून जिल्हा प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे आदेश आले नाहीत. जिल्ह्यात शेती व्यवसायाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शासनाने संपूर्ण विदर्भातच दुष्काळ जाहीर केला आहे; मात्र २९ मार्चपर्यतही हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यासह हा निर्णय लागू असलेल्या अन्य जिल्ह्यातही संभ्रमाचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा सुरु आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात प्रचंड घट आली असून, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करीत आहेत. खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले. पिक परिस्थतीचे अवलोकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नजरअंदाज, सुधारीत व अंतिम पैसेवारी काढण्यात आली. शेतकरी, लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनांच्या निवेदनांची दखल घेत शेतकऱ्यांवर अन्याय होवू नये, म्हणून खुद्द जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी अधिकाऱ्यांसह शेतात जावून पिकाची पाहणी केली होती. पैसेवारीचे निकष शासनाने ठरवून दिले होते. त्या निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अंतिम अहवाल घोषित केला. तो अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला.जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची अंतिम पैसेवारी ५४ पैसे दर्शविली. यातील पवनी तालुका वगळता सहाही तालुक्यातील ३७१ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ४७५ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली. या पैसेवारीचा लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची मागणी करण्यात येत होती. अंतिम पैसेवारी अहवाल पाठवून दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी नाही, असा जावई शोध काढला होता. जिल्हा प्रशासनाच्या पैसेवारीला राज्य शासनाचा 'ठेंगा' दाखविला असून दुष्काळग्रस्तातून ३७१ गावांनाही वगळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यांतील ३७१ गावांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करताना अशा गावांसाठी लागू असलेल्या उपाययोजना लागू करण्याचा निर्णय शासनाने होळी सणाच्या पुर्वसंध्येला घेतला. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्यापही हा निर्णय जाहीर न करण्यात आल्याने शासनाचा निर्णय लागू असणाऱ्या जिल्ह्यांतील जनतेसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला विचारले असता माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (नगर प्रतिनिधी)