शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
3
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
4
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
5
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
6
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
7
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
8
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
9
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
10
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
11
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
12
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
13
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
14
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
15
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
16
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
17
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
19
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
20
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'

जांब येथे दारुबंदीसाठी ३४२ महिला सरसावल्या

By admin | Updated: October 30, 2015 00:45 IST

मोहाडी तालुक्यातील जांब येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु दुकाने असल्याने गावातील, तरुण, युवक, प्रौढ पुरुष वर्ग दारुच्या आहारी गेले आहेत.

महिला सरपंचांनी घेतला पुढाकार : महिला ग्रामसभेत दारुबंदीचा घेतला ठरावजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु दुकाने असल्याने गावातील, तरुण, युवक, प्रौढ पुरुष वर्ग दारुच्या आहारी गेले आहेत. परिणामी अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत.जांब येथे मागील ७ वर्षापासून रेंगाळत असलेल्या दारुबंदीचा ठराव वारंवार घेऊन सुद्धा गावातील कोणत्याही व्यक्तीने पुढाकार घेतला नव्हता. गावामध्ये अवैधरित्या दारु विकणारे व देश्ी दारुचे दुकान आहेत. यामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात तंट्यामध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन प्रथमच महिला सरपंच दीपाली उके यांनी पदभार स्वीकारताच गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.मागील काही वर्षापासून दारुबंदी करण्यासाठी २८ आॅक्टोबरला महिलांची आमसभा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नलिनी कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आमसभेमध्ये सरपंच दिपा उके, उपसरपंच सुधाकर मेश्राम, ग्रामविकास अधिकारी आर.एस. कावळे, ग्रामपंचायतचे सदस्य, सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी व पंचायत समिती सदस्य जगदिश उके व गावातील एकूण ३४२ महिला उपस्थित होते. एका दिवसापूर्वी गावात आॅटो फिरवून दवंडी पिटून दारुबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. महिला सरपंचांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतल्यामुळे या प्रकारची दवंडी पिटण्याची गावातील ही पहिलीच वेळ होती. आमसभेमध्ये दारुबंदीचा सर्वानुमते ठराव मंजुर करण्यात आला. जांब गावामध्ये चार वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये १० महिलांचा समाविष्ट करण्यात आले. गावातील चारही समितीच्या अध्यक्षपदी सरपंच दीपा उके यांची निवड करण्यात आली. गाव विकासाकरिता दारुबंदी करून एक आदर्श गाव बनविण्याची तयारी सरपंचांनी तयारी दशर््विली. सरपंच उके यांनी सात महिन्यात दारुबंदीचा काम हातात घेतल्याने गावातील महिला व पुरुष मंडळींनी त्यांचे कौतुक करीत आहेत. (वार्ताहर)लोहारातील महिलांनी केली दारुबंदीतुमसर तालुक्यात येत असलेल्या लोहारा गावातील महिलांनी दारुमुळे माणसाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर दारुबंदीसाठी आंदोलन छेडले. गावातील दारुबंदी करण्यासंदर्भात महिलांची तसेच पुरुषांची ग्रामसभा आयोजित करून गावातील दारु बंदी करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव घेण्यात आला. महिलांसह पुरुषांनी सहभाग दर्शवून गाव दारुमुक्त करण्याचा उपक्रम राबविला आहे. दारुबंदीसाठी गावात महिला व पुरुषांची रॅली काढून दारुपासून होणाऱ्या वाईट परिणामांची गावकऱ्यांना जाणीव करून दिली. या दरम्यान दारुबंदी समिती स्थापन करण्यात आली. तसेच एक विशेष सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. सभेमध्ये दारुमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये घरातील कुटुंब प्रमुखांचे रोजगाराकडे, आपल्या कामाकडे, कुटुंबाकडे, शेतीकडे, दारुच्या व्यसनामुळे होणारे दुर्लक्ष तसेच घरातील महिलांना मारहाण करणे, घरातील तरुण, युवा पिढीला दारुचे व्यसन जडणे, गावातील शांतता भंग होवून झगडे, भांडण, तंटे होणे आदी समस्यांचा या सभेमध्ये विचार करण्यात आला व या सर्व समस्यांवर आळा बसविण्यासाठी दारुबंदी केली पाहिजे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच महिला मंडळी आपल्या दारुबंदीच्या कामाला आले. गावात विकणारे सर्व दुकान बंद करण्यात त्यांना यश आले. रात्री बेरात्री दारु विकणाऱ्यांवर नजर ठेवून दारु विकणाऱ्यांना पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आज परिसरातील लोहारा येथील दारु बंद करण्यात महिलांना यश आले आहे. दारु बंद करण्यात समिती अध्यक्ष फुलन माकडे, उपाध्यक्ष राऊत, सचिव सुनिता ठाकरे, सदस्य गोडबोले, पिपरधारे, सिंगाडे, हुमणे, ठाकरे तसेच दारुबंदीच्या सर्व महिला सदस्यांचा मोठा सहभाग लाभतो.