शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यातील 33 गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 05:00 IST

स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : नियमित वीजबिलासह मागील काही महिन्यांपासून थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत लाखांदूर तालुक्यातील ३३ गावांतील पथदिव्यांची व २ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावात अंधार पसरला असून दोन गावांत पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, ग्रामपंचायतअंतर्गत सदर वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तब्बल ३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १०३ पथदिव्यांची कनेक्शनअंतर्गत थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांश वीजपुरवठा खंडित केले जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.तथापि, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ३३ गावांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतून विषारी जीवजंतू जमिनीबाहेर निघण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. या स्थितीत रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावात रस्त्यावर अनेक जीवजंतू निघण्याची संभाव्यता घेऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पाण्याची समस्या कायम- लाखांदूर तालुक्यातील पाउळदवणा व मडेघाट ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदरचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीत स्थानिक नागरिकांना बोरवेल, खासगी तथा सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेत वीज कंपनीअंतर्गत थकीत वीजबिलाचा भरणा घेऊन केल्या जात असलेल्या कारवाईला थांबविण्याहेतू आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

 

टॅग्स :electricityवीजWaterपाणी