शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

३२ शेतकºयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देकर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सन्मान : दिवाळीचा आनंद झाला द्विगुणित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. दिवाळी पर्वावर शासनाने कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळला असून शेतकºयांच्या जीवनात नवा आनंद फुलविण्याचे काम आजच्या दिवसाने केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सोहळयात शेतकºयांनी दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. कार्यक्रमास आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा बँकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर, अधिक्षक वरुणकुमार सहारे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख व लाभार्थी शेतकरी कुटुंबीय उपस्थित होते.महाकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८६ हजार ६२६ शेतकºयांना ११८ कोटीची कर्जमाफी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या कर्जमाफी संदर्भात उत्कृष्ट नियोजन केले होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील प्रातिनिधीक स्वरुपात ३२ शेतकरी कुटूंबाचा साडीचोळी व कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य समारोह मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.निकषात बसणारा शेवटचा शेतकरी जो पर्यंत कर्जमुक्त होणार नाही. तो पर्यंत महाकर्जमाफी योजना बंद होणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकºयांना दिली. आज प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीची सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारपासून नियमित रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकºयांना रक्कम जमा केल्याचे मोबाईल संदेश प्राप्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आजचा दिवस शेतकºयांना समर्पित असून हा दिवस शेतकरी दिवस म्हणून पाळला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमातून व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे व शेतकºयांशी संवाद साधला. शासनानी कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. या सोहळयात शेतकºयांच्या चेहºयावरील आनंद पाहून शेतकरी शासनाला धन्यवाद देत आहेत, असे आमदार चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटूंबावर असलेले एक लाख २० हजार रुपयाचे कर्ज माफ करुन दिवाळी भेट दिली. शासनाचा महाकर्जमाफीचा निर्णय शेतकºयांना नवी उभारी देणारा असून आज कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देवून आपला आनंद द्विगुणित तर केलाच सोबतच दिवाळी ही गोड केली.-उषा अशोक मेटे, परसवाडा, ता. तुमसर