शहरं
Join us  
Trending Stories
1
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
2
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
3
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
4
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
5
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
6
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
7
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
8
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
9
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
10
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार
11
"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
12
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
13
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
14
३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत
15
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात, Nifty ६० अंकांनी घसरला; IT Stocks आपटले
16
Mithun Chakraborty: 'बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!'; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
17
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
18
IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश
19
"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
20
ठाणे : बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, २९ पीडित मुलांची केली सुटका; संचालकासह पाच जणांवर गुन्हा

शाळेत कार्यरत ३ तासिका शिक्षक; मात्र पगार काढला पाच कर्मचाऱ्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:19 IST

प्रशासनाकडून दिशाभूल : शाळेतील अन्य शिक्षकांनीच केली गटशिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर (भंडारा): शासनामार्फत नियमित शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त केले जातात, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल काढले. या प्रकाराची असल्याची तक्रार शाळेतीलच अन्य २ घड्याळी तासिका शिक्षकांनी केली आहे. ही तक्रार १६ एप्रिल रोजी लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांना लेखी स्वरूपात केली आहे. संदीप वामनराव मेश्राम व सुरज मारोती बावणे असे तक्रारदार शिक्षकांची नावे आहेत.

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालय इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. शासनाकडून नियमित शिक्षकांची भरती केली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घड्याळी तासिका शिक्षकांची नियुक्ती केली जाते.

मात्र शाळा प्रशासनाने शासनाची दिशाभूल करीत ३ ऐवजी ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगारबिल काढून पंचायत समिती कार्यालयाला पाठविले आहेत. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या प्रशासनाविरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरू शाळेत केवळ ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल शासनाला पाठवून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरू असल्याचे शाळेतीलच अन्य शिक्षकांनी सांगितले. पगारबिल प्राथमिक विभागाचे घड्याळी शिक्षक म्हणून काढण्यात येत असल्याचा प्रकार आहे. ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी चक्क तक्रारदारासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असे तक्रारकर्ते मेश्राम यांनी सांगितले. 

अशी आहे नियुक्तीमहाविद्यालयात ५ व्या वर्गासाठी नियमित शिक्षक नियुक्त आहे. ६ ते ८ वर्गासाठी १ नियमित तर २ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत आहेत. ९ ते १० वर्गासाठी १ नियमित शिक्षक व १ घताशी शिक्षक कार्यरत आहेत. ११ व १२ वी कला तथा विज्ञान शाखा विना अनुदानित आहेत. विज्ञान शाखेसाठी ३ तर कला शाखेसाठी २ शिक्षक नियुक्त आहेत. कला शाखेसाठी १ नियमित शिक्षक नियुक्त आहेत. तथापि शाळेत ५ ते १० वर्गासाठी ३ घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

"शाळेत ३ घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना शाळा प्रशासनाच्या वतीने ५ घड्याळी तासिका शिक्षकांचे पगार बिल काढले जात असल्याची तक्रार मला प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर उद्याच चौकशी केली जाणार आहे."- तत्त्वराज अंबादे, गटशिक्षणाधिकारी

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षण