शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजनेचा ३ कोटींचा निधी गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:37 IST

प्रशासनावर नाराजी : भटक्या, विमुक्त समाजाचे घरकूल अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या व विमुक्त समाजाच्या कुटुंबांसाठी असलेल्या घरकूल योजनेकरिता आलेला ३ कोटी रुपयांचा संबंधित निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला. यासंदर्भात ढिवर समाज संघटनेने समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन मडावी यांना निवेदन देत, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली. भंडारा जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिवर समाज संघटनेने संघर्ष केला. सततच्या आंदोलनामुळे ४ हजार घरकुलांना मंजुरी मिळवण्यात यश आले. मात्र, ३० कोटींच्यावर निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यानंतर, या योजनेसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला.

संघटनेद्वारे गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निधी मिळवण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांच्या आश्वासनानुसार, ३१ मार्चपर्यंत ३ कोटी रुपयांचा निधी बीडीएस प्रणालीद्वारे देण्यात आला. पण, सामाजिक न्याय विभागाद्वारे ३१ मार्चपर्यंत निधी वितरीत न केल्यामुळे संबंधित निधी शासनाकडे परत गेला. हलगर्जीपणामुळे या योजनेंतर्गत अनेक भटक्या कुटुंबांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

आंदोलनाची तयारीदोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी. घरकुलांसाठी निधीचे वाटप तातडीने करावे. अन्यथा, संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असा इशारा करचखेडा सरपंच व जिल्हा संघटक सुभाष उके, मार्गदर्शक डॉ. अविनाश नान्हे, जिल्हा संघटक प्रवीण मडामे, संघटक रवी उके, पंकज राऊत यांनी दिला आहे.

निधीच्या प्रतीक्षेत ससेहोलपटयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत पहिल्या ५ वर्षामध्ये एकही लाभार्थी नव्हता. मात्र, ढीवर समाज संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे घरकुलांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. परंतु, गत दीड वर्षांपासून मंजूर घरकुलांसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे हजारो भटक्या कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नदीकाठच्या गरीब भटक्या व विमुक्त समाजातील लोकांनी आपली मातीची कौलांची घरे तोडून नवीन घर उभारण्याचे काम सुरू केले आहे. पण, निधीच्या प्रतीक्षेत ही घरे अपूर्ण आहेत.

चौकशीची मागणीघरकुल योजनेसाठी आलेला ३ कोटींचा निधी परत गेल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे

"मुक्त वसाहत योजनेच्या घरकुलासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीकरिता जोमाने प्रयत्न केले जातील. तसेच ३ कोटींचा निधी परत गेल्यासंदर्भात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल."- सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग

"यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली. मात्र, शासनाकडे ३० कोटीपेक्षा अधिक निधी प्रलंबित आहे. त्यातच मार्च महिन्यात ३ कोटींचा निधी वेळेवर न वापरल्याने परत गेला ही शोकांतिका आहे. घरकुलांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत असून, भटक्या समाजाला स्थैर्य मिळवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे."- सुरेश खंगार, अशासकीय सदस्य मुक्त वसाहत योजना

टॅग्स :bhandara-acभंडारा