लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यात झालेल्या ६१ रस्ता अपघातात २९ जण मृत्युमुखी पडले असून ७२ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये सर्वांधिक संख्या दुचाकी चालकांची आहे.भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणे असून सर्वाधिक दुर्घटना कारधा आणि लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात १६ जण मृत्युमुखी पडले असून त्यात भंडारा ठाण्यांतर्गत चार, जवाहरनगर एक, वरठी दोन, करडी एक, तुमसर चार, साकोली तीन, अड्याळ दोन, दिघोरी दोन आणि आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, पालांदूर, पवनी लाखांदूर ठाण्यांतर्गत प्रत्येक एक अपघात झाला. यापैकी १४ जणांचा मृत्यू जाग्यावरच झाला.भंडारा शहरातील शितला माता मंदिराजवळ असलेल्या खड्डयाने एका तरूणाचा बळी घेतला. गत सहा महिन्यांपासून या परिसरात निर्माणाधीन रस्त्यावर खड्डे पडले होते. परंतु त्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघाताची नोंद होत आहे. मुजबी ते शिंगोरीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग दुहेरी असून रस्त्याच्या मधात दुभाजकही नाही.वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. जिल्ह्यात झालेल्या अपघातात सर्वाधिक मृतांची संख्या दुचाकी चालकांची आहे. त्यापैकी कुणीही हेल्मेट घातले नव्हते.-चंद्रशेखर चकाटे, वाहतूक शाखा प्रमुख
रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी
ठळक मुद्दे६१ अपघात : ७२ जखमी, मृतांमध्ये दुचाकी चालकांची संख्या अधिक