शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २०१३-१४ मध्ये प्राप्त झालेल्या ४६ पैकी २९ प्रकरणांत शेतकरी कुटुंबांना २९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. ११ मार्च २०१५ अखेर आठ परिपूर्ण प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.या योजने अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाचे भंडारा व साकोली, असे दोन उपविभाग आहेत. भंडारा उपविभागात भंडारा, पवनी, मोहाडी, तर साकोली उपविभागात साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्याचा समावेश आहे. दोन्ही उपविभागात ४६ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे विमा कंपनीला कृषी विभागाने सादर केली. यापैकी २९ प्रस्ताव कंपनीने मंजूर केली होती. ३ प्रकरणे नामंजूर केले. ६ प्रकरणे प्रलंबित आहेत. आठ परिपूर्ण प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. यापैकी २९ मंजूर प्रकरणात शेतकरी परिवाराला २९ लाखांचे अनुदान ११ मार्च २०१५पर्यंत देण्यात आले असल्याची माहिती आहे.
अपघात विम्याचे शेतकऱ्यांना २९ लाख
By admin | Updated: March 20, 2015 00:38 IST