शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

१८३ शाळांमधील २८३ वर्गखोल्या धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:19 IST

Bhandara : यशस्वीच्या मृत्यूने आणलं भयानक वास्तव समोर

लाखांदूर : तालुक्यातील पुयार स्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यशस्वी राऊत या चिमुकलीचा विद्युत शॉक लागून जीव गेला. प्राथमिक शाळांमधील वास्तव यानिमित्ताने समोर आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७९४ प्राथमिक शाळांपैकी १८३ शाळांमधील २८३ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहे.

हजारो शिक्षक व लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आला काय? असा प्रश्न पालकगण या घटनेनंतर उपस्थित करीत आहे. अशा स्थितीत येथील बालके अध्यापन करीत आहेत. यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली तरी ती त्वरित अंमलबजावणीत यावीत, अशी पालकांची मागणी आहे.

लाखांदूर तालुक्याच्या पुयार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या यशस्वी सोपान राऊत या चिमुकलीचा विद्युत प्रवाहाने जागीच मृत्यू झाला होता. शाळा सुरू होण्याच्या तिसऱ्याच दिवशी या चिमुकलीचा अंत पाहून अनेकांचे डोळे पाणावले. 

फुलासारखी यशस्वी डोळ्यादेखत गतप्राण झाली, यशस्वीच्या पालकांच्या काळजाचा तुकडाच नियतीने हिरावला. चिमुकल्या यशस्वीचा काय दोष होता, शाळा कार्यप्रणालीच्या दोषाची ती बळी ठरली काय? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती शिक्षण विभागावर झाली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती काय यावर चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भौतिक सुविधा खरंच विद्यार्थ्यांना मिळताहेत का? त्यांची सुरक्षा खरंच होतेय का? असे अनेक नानाविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. पुयारच्या घटनेनंतर शिक्षण विभाग सरसावला असला तरी फुलासारखी 'यशस्वी' आता परत येऊ शकत नाही. तिच्या अशा दुर्देवी मृत्यूने प्रशासनाचे डोळे उघडले गेले.

वार्षिक निधीतून १३ कोटींची तरतूदमाहितीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण ७९४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमधील १८३ मधील २८३ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. या खोल्या निर्लेखित करून त्यांचे नवीन बांधकाम करण्याची गरज आहे, जीर्ण झालेल्या २८३ वर्ग खोल्यांच्या जागी बांधकाम करण्यासाठी जिल्हा वार्षिक विकास निधी अंतर्गत १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रत्येक बांधकामामागे १२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. चालू सत्रात या वर्ग खोल्यांचे बांधकाम होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. होणारा धोका लक्षात घेऊन वर्गखोल्यांचे बांधकाम प्राधान्य क्रमाने करून अन्य भौतिक सुविधांतर्गत शुद्ध पाणी, क्रीडांगण, संतुलित पोषण आहार यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून दुसरी कुणी यशस्वी' अव्यवस्थेचा बळी ठरू नये.

"जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतर्गत धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांच्या बांधकाम संदर्भात जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी देण्यात येणार आहे. त्या संबंधाने कारवाई सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशांतर्गत शैक्षणिक गरजा निश्चिती समितीमार्फत शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जात आहे."- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भंडारा 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाbhandara-acभंडाराAccidentअपघात