शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत 86 अपघातात 28 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या ८६ अपघातांत २८ जणांचा बळी गेला असून, ९८ जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीच्या संपानंतर अपघातात वाढ झाल्याचे दिसत असून, सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. रस्ते सुस्थितीत असले तरी अलीकडील काही वर्षात अपघाताचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत.गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते. गतवर्षी जानेवारी महिन्यात ४२ अपघातांत १५ जणांचा मृत्यू, तर ३६ व्यक्ती जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३५ अपघातात दहा जणांचा मृत्यू, तर ३७ जण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी याच महिन्यात ३६ अपघातांत २० जणांचा बळी गेला, तर ४७ व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे होय. वारंवार जनजागृती करूनही नागरिक नियम पायदळी तुडवितात आणि अपघात घडतात.

भंडारा ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात 

- गत दोन महिन्यांत सर्वाधिक १६ अपघात भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या. त्यात तिघांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मोहाडी ठाण्यांतर्गत पाच अपघातात आठ जण जखमी झाले. कारधा ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात चार जणांचा मृत्यू आणि २९ व्यक्ती घायल झाले. वरठी ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात एका जणाचा मृत्यू, तुमसर ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात एकाचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी झाले. साकोली ठाण्याच्या हद्दीत १५ अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक अपघात दुचाकीचे- जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले आहे. एसटीच्या संपामुळे पर्याय नसल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात. मात्र नियमांचे पालन करीत नाही. मद्य प्राशन करून दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायक ओव्हरटेक करणे या कारणांमुळे अपघात झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Accidentअपघात