शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

लोकसहभागातून झाले २७१ वर्गखोल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:46 PM

ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा स्पर्धेत सरस ठरावा त्याला माहिती व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शिक्षण विभागाचा पुढाकार : ४२० शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणार

आयटी शिक्षणाचे धडेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा स्पर्धेत सरस ठरावा त्याला माहिती व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. सातही तालुक्यात लोकसहभाग व सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या ४२० शाळा डिजिटल करण्यात आले आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षणाचे धडे मिळत आहे. २७१ वर्गखोल्या या लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत, हे विशेष.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावे. जबाबदार नागरिक होण्यासाठी तो सक्षमपणे शिकावा व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल वर्गखोल्यांची संकल्पना मांडण्यात आली. यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रगत शाळा व डिजीटल वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली.जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल वर्गखोल्या कार्यरत आहेत. यात ९९ शाळांमधील वर्गखोल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून, ४९ वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानातून तर उर्वरित २७१ वर्गखोल्या लोकसहभागातून डिजीटल करण्यात आले आहेत. या वर्गखोल्यांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, एलसीडी टी.व्ही. व इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे हसतखेळत व चलचित्र बघत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जातो.जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ६२ डिजीटल शाळा, मोहाडी तालुक्यात ५९, तुमसर तालुक्यात ७७, साकोली तालुक्यात ४४, पवनी तालुक्यात ५८, लाखनी तालुक्यात ८० व लाखांदूर तालुक्यात ४० अशा एकूण ४२० शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. याविशाय भंडारा तालुक्यातील १२८ शाळा, मोहाडी तालुक्यात ८९, तुमसर तालुक्यात ९३, साकोली तालुक्यात ९४, पवनी तालुक्यात १२०, लाखनी तालुक्यात ८९ व लाखांदूर तालुक्यात ८० अशा एकूण ६९३ शाळा प्रगत शाळा म्हणून नावारूपास आल्या आहेत. काही शाळा प्रगत व डिजीटल अशा दोन्ही प्रकारात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील उर्वरित जिल्हा परिषद शाळा जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून डिजीटल व प्रगत करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. या टिमच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा आलेख उंचाविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.