शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात नगर परिषदांच्या २० वर्षांत संपल्या २७ शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:02 IST

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी घट : शिक्षकांची संख्याही रोडावली

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी शासन जीवाचा आटापिटा करीत आहे. परंतु सत्य काही वेगळेच आहे. भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांची मोठ्या प्रमाणात गच्छंती झाली आहे. एकेकाळी ४७ शाळांचे संचालन नगर परिषद प्रशासन करीत होती. आजघडीला त्याची संख्या फक्त २० वर येऊन ठेपली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटसंख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रशासन मोठी कसरत करीत आहे. परंतु त्या विपरीत नगर परिषद किंवा नगरपंचायत हद्दीत असलेल्या उत्थानाबाबत शाळांच्या कारवाई होताना दिसून येत नाही. नगर परिषद शाळा वाचविण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली होत असल्या तरी स्थिती काही वेगळीच आहे. एकट्या भंडारा नगरपालिका क्षेत्रात १३ शाळ होत्या. त्यापैकी आजघडीला फक्त दोनच शाळा शिल्लक आहेत. भंडार शहरातील शहीद भगतसिंग उच्च प्राथमिक शाळा टाकळी भंडारा व मौलाना उर्दू प्राथमिक शाळेचा समावेश आहे. 

उरल्या फक्त २० शाळाभंडारा जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत संचालित होणाऱ्या एकूण २० शाळा आहेत. यात प्राथमिक शाळा ११, उच्च प्राथमिक शाळा ३, उच्च प्राथमिक व हायस्कूल ५ आणि प्राथमिक- उच्च प्राथमिक व सेकंडरी शाळा एक आहे. भंडारा, तुमसर व पवनी नगरपालिका क्षेत्रातील शाळा गत २० वर्षात झपाट्याने रोडावल्या.

नेमके कारण तरी काय?नगर परिषदेच्या क्षेत्रांमध्ये पालिका प्रशासनाने अन्य शाळांना एनओसी देण्याचे काम मोठ्या झपाट्याने केले. त्यामुळे नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत गेली. दुसरीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीचा वाढता प्रभाव या नगर परिषदेच्या शाळांना बसला. सहाः स्थितीत गरिबांची मुलेच नगर परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. बजाज प्राथमिक शाळा, बुटी शाळा, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यासह अन्य शाळा बंद झाल्या. त्यातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडलेत. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाbhandara-acभंडारा