शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सहा दशकांपासून २६२ कुटुंबे मालकी हक्कापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:23 IST

टाकळीतील प्रकार : ६५ वर्षांपासून शहराचे सिटी सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील २६२ कुटुंबे अशी आहेत, ज्यांना मागील सहा दशकांपासून त्यांचे मूलभूत हक्क म्हणजेच त्यांच्या मालकीच्या जागेची आखीव पत्रिका मिळालेली नाही. गत १० वर्षांपासून त्यांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या दरवाजावर अनेक वेळा दस्तक दिली आहे. २५ हून अधिक वेळा पत्रव्यवहार झाले आहेत. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. कारण, मागील ६५ वर्षापासून भंडारा शहराचे सिटी सर्वेक्षणच झालेले नाही.

१९५९ मध्ये शहराचे पहिले सिटी सर्वेक्षण झाले होते. ६५ वर्षे उलटून गेली आहेत. सर्वेक्षणात नागरिकांची मालकीची जागा मोजून प्रमाणपत्र दिले जाते आणि शहराच्या हद्दी ठरवल्या जातात. 

न्यू टाकळीतील २६२ कुटुंबे वंचित भंडारा शहराच्या हद्दीत भंडारा नझुल, भंडारा खास, मौजा पिंगलाई, मौजा गणेशपूर आणि मौजा केसलवाडा या भागांचा समावेश आहे. मात्र फक्त भंडारा खास, भंडारा नझुल आणि मौजा गणेशपूरचा सिटी सर्व्हे एकदा झाला आहे, बाकीचे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या मालमत्तेचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणारी नवीन टाकळी भागातील २६२ कुटुंबे मालमत्तेच्या अधिकारांपासून वंचित आहेत. घर बांधकामासाठी अनुदान दिले, परंतु त्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले नाही.

२५ पत्रव्यवहार आणि ७०० चकरा सामाजिक कार्यकर्ते प्रीतमकुमार राजाभोज यांनी २०१५ मध्ये या मुद्द्याला वाचा फोडली. त्यांनी प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. मागील १० वर्षांत त्यांनी तहसीलदार, भूमी अभिलेख, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभागीय आयुक्त नागपूर, पालक सचिव भंडारा, मुख्य राज्य लोकसेवा आयोग यांच्याकडेही २५ पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला असून, ७०० पेक्षा जास्त वेळा कार्यालयांमध्ये चकरा मारल्या आहेत.

राज्यपालांकडून न्यायाची अपेक्षासोमवारी राज्यपाल राधाकृष्णन जिल्ह्यात आले असता त्यांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भंडारा शहरातील नागरिक त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित असल्याची माहिती दिली होती. या २६२ कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, याबाबत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून हा विषय लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.  

टॅग्स :bhandara-acभंडारा