शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

२,५२७ लोकांना १४ कोटींची 'मुद्रा'

By admin | Updated: March 11, 2016 00:43 IST

सृूक्ष्म व लघु उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ....

देवानंद नंदेश्वर भंडारासृूक्ष्म व लघु उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात २,५२७ लोकांना १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेत २,३२३ लोकांना, किशोर योजनेत १६६ तर तरूण योजनेत ३८ उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी मुद्रा योजनेमध्ये महिन्याला २० प्रस्ताव देणे आवश्यक आहे. ज्या बँक मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देत नाहीत, त्यांची तक्रार लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेचा शुभारंभ केला होता. योजनेचा शुभारंभ होताच आठ दिवसात प्रत्येक बँकेने किमान २५ केसेस मुद्रा योजनेच्या कराव्यात, अशी बंधणे घालून योजना अत्यंत कमी दिवसात किती लोकप्रिय झाली, हे यातून केंद्र सरकारला दाखवून द्यावयाचे होते. त्यानुसार बँकांनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद दिल्याने ही योजना कमी दिवसात प्रसिद्धीच्या झोतात आली. याबरोबरच ज्या बँका केसेस करण्यात कुचराई करीत होत्या, त्यांच्या तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाल्या. आता योजना सुरू झाल्यापासून ३१ जानेवारीपर्यंत म्हणजे मागील चार महिन्यात जिल्ह्यातील २३ बँकांनी १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे वाटप केले. यामध्ये शिशू योजनेमध्ये २,३२३ ग्राहकांना ८ कोटी ३३ लाख ३३ हजार रुपये, किशोर योजनेमध्ये १६६ ग्राहकांना २ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपये तर तरूण योजनेमध्ये ३८ ग्राहकांना २ कोटी ६८ लाख ५ हजार रुपये असे १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय उभा करून त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली मुद्रा योजना उत्तम आहे. या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात नक्कीच वाढ होईल. - संजय पाठक,व्यवस्थापक, अग्रणी बँक, भंडारासर्वाधिक वाटप विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचेभंडारा जिल्ह्यात २३ बँकांना मुद्रा योजनेचे टार्गेट देण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक वाटप विदर्भ कोकण ग्रामीण या बँकेने ३ कोटी ५४ लाख ५ हजार रूपयाचे वाटप केले. ५६६ लाभार्थ्याना हे कर्ज वाटप केले. त्या खालोखाल बँक आॅफ इंडीया ने ६०५ ग्राहकांना २ कोटी २० लाख ७४ हजार रूपयांचे तर तिसऱ्या क्रमांकावर बँक आॅफ महाराष्ट्र बँकेने १३४ ग्राहकांना १ कोटी १६ लाख ६२ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले. याशिवाय अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, एक्सीस बँक, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ हैदाबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, विदर्भ बँक या बँकानी कर्ज वाटप केले आहे. तीन टप्प्यात मुद्रा कर्ज योजनालहान वयापासूनच व्यवसायामध्ये गोडी निर्माण व्हावी, म्हणून शिशू ते तरूण वयापर्यंत अशी तीन टप्प्यात ही योजना आहे. यामध्ये शिशू योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते, किशोर योजनेत ५० हजार ते ५ लाख आणि तरुण योजनेत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.