गावकऱ्यांचा विरोध : जमीन वनविकास महामंडळाला सुपूर्द करण्याचा आदेश पोहोचलारामचंद्र करमकर - आलेसूरतुमसर तालुक्यातील दाट वनसंपदा व निसर्ग सौंदर्य सृष्टीची ओळख असलेल्या वनक्षेत्र, लेंडेझरी, जांब कांद्री व नाकाडोंगरी या वन विभागातील वन जमिन २५ हजार हेक्टर शासनाच्या आदेशान्व्ये दि.१ जुलै २०१४ ला वनविकास महामंडळाच्या सुपूर्द करण्याचा आदेश वन विभाग कार्यालयात धडकला आहे.परिणामी वनालगत असलेल्या परिसरात वन विकास महामंडळाचा जोरदार विरोध होत आहे व स्थानिक कार्यकर्ते संकटमोचन राजकीय पुढाऱ्यांचे दार ठोठावत आहेत.वनविभागातील नियमानव्ये एका बिट रक्षकाकडे किमान १००० एक हजार हे.आर. वन जमिन संरक्षण व संवर्धनाकरीता सोपविण्यात येते. या प्रमाणे कांद्री वनपरिक्षेत्रातील ११ आरक्षित वन कक्ष, नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत ४ आरक्षीत वनकक्ष व लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील आरक्षित बिट निहाय कक्ष अनुक्रमे कक्ष क्रमांक २८ आलेसूर, ६० चिखली भाग २-५२ लेंडेझरी, ५१ लेंडेझरी, ४९ लेंडेझरी, ६१ गर्रा ८ भत्तग १, ३४ लव्हादा, ३५ लव्हादा, ३६ मंगरली, ३१ रोंघा याप्रमाणे लेंडेझरी वनक्षेत्रातील १० वनकक्ष एकूण २५ वन कक्ष महामंडळाला हस्तांतरीत करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत भंडारा वनविभागा अंतर्गत लेंडेझरी वनपरिक्षेत्रात एकूण २० बिट असून ५ सह वनक्षेत्र र ाऊंड व किमान स्थायी, अस्थायी व दैनंदिन मजुरासह १२४ कर्मचारी व मजुर समाविष्ठ आहेत. यापैकी निम्मे वन कक्ष वनविकास महामंडळाला हस्तांतरीत झाल्यावर किमान २१ स्थायी कर्मचारी इतरत्र हलविण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सदर वनपरिक्षेत्रात कित्येक आदिवासी भोगवटधारकांची वनभूमीवर उपजिविका सुरू असून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कायद्याअंतर्गत मोजक्याच भोगवट धारकांना अधिकृत रित्या पट्टे वाटप् करण्यात आले आहेत. परंतु अधिकांश वहीवाट धारकांनी निरक्षरते अभावी जिल्हा उपविभागीय समितीला योग्य व अचुक कादोपत्रांचा पाठपुरावा न केल्यामुळे त्यांचे बहुतांश वन हक्क दावे फेटाळण्यात आले आहेत. परिणामी उदरनिर्वाह करीत असलेल्या वनभूमीला महामंडळा अंतर्गत भुई सपाट करण्यात येईल, अशी भिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वन व वनालगत असलेल्या आदिवासी वर्गाचे निस्तार हक्क बाधीत होवून महामंडळाअंतर्गत रोपवन केलेल्या कार्यक्षेत्रात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, मोहफुले, तेंदूपान, मध गोळा करणे, वन तलावातील मत्स्यपालन, पशुधन व वनाअंतर्गत मिळणाऱ्या रोजगारापाूसन बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२५ हजार हेक्टर वनजमीन सुपूर्द
By admin | Updated: July 1, 2014 01:18 IST