शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:42 IST

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात १० पोलीस हजार : कामाचा वाढता व्याप, सीमेवरील पोलीस चौकी अंधातरी
<p>रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे.मध्यप्रदेश आणि दोन नक्षलग्रस्त जिल्ह्याचे सीमेलगत असलेल्या सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये मंजूर ५६ पदे आहेत. परंतु ही पदे आजपर्यंतच्या कधीच पुर्णत: भरण्यात आली नाही. पोलीस निरीक्षकाचे १ पद असून उर्वरित ५५ पदे पोलिसांची आहेत. यात २५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदात सहायक फौजदार चार, हवालदार १०, नायक पोलीस पाच, पोलीस शिपाई सहा यांचा समावेश आहे. पोलीस ठाण्यात ३० पोलीस कार्यरत असले तरी अर्धे अधिक पोलीस दैनंदिन कामात व्यस्त राहतात. अनेक पोलीस कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, वैद्यकिय रजा, न्यायालय तथा वरिष्ठ कार्यालयात सेवा बजावित आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये फक्त १० पोलीस कर्मचारी प्रशासकीय कारभार करीत आहेत.यामुळे बिट मधील प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. एका बिटमध्ये सात ते आठ गावांचा समावेश होत आहे. बिट अमलदारांची दमछाक होत आहे. सहायक फौजदार व हवालदाराची महत्वपूर्ण पदे रिक्त असतांना घटनेचा तपास करतांना कार्यरत कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनुभवी व तपास कार्याला गती देणारे कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाही.पोलीस स्टेशनमधील रिक्त पदे भरण्याचे संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सातत्याने अहवाल पाठविण्यात येत आहेत. परंतु गांभिर्याने घेण्यात येत नाही. आगामी सणासुदीच्या काळात बंदोबस्तात वाढ होणार आहे. त्याचाही ताण पोलीसांवर येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. एकाद्या गावात घटना घडल्यास तेथे पोहचण्यास उशिर होत असल्याने नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागते. पोलिसांची रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकर घ्यावा अशी मागणी परिसराती नगरिक करीत आहेत.पोलीस चौकीचा प्रश्न प्रलंबितबपेरा आंतरराज्यीय सीमेवर जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने चौकी परिसरातील पाहणी केली आहे. परंतु पोलीस चौकी बांधकामाचे अद्याप मुहूर्त काढण्यात आला नाही. निधी नसल्याची माहिती सांगण्यात येत असली तरी गेल्या अनेक वर्षापासून पोलीस चौकी मंजुरीचा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांत नाराजी व्यक्त होते आहे.पोलीस ठाण्यात रिक्त पदे असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. कार्यरत पोलिसांवर वाढता ताण, तात्काळ रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा कार्यालयाने पुढाकार घ्यावा.-धनेंद्र तुरकर,सभापती. जिल्हा परिषद भंडारा