शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोक अदालतीत २४९ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:11 IST

तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली.

ठळक मुद्दे२०,९१,३४३ रुपयांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली.यात ४५६ प्रलंबित प्रकरणापैकी २९ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. प्रलंबित प्रकरणातून १६ लाख २५,८५७ रुपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये बँकेची १०० प्रकरणांपैकी ३ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २,००४ रुपयांची वसुली करण्यात आली. १९ ग्रामपंचायतीच्या १७६६ प्रकरणापैकी १९१ प्रकरणातून ३,१२,८११ रुपयांची वसुली करण्यात आली. नगर परिषदेच्या ९४ प्रकरणापैकी १२ प्रकरणातुन ६४,२१९ रुपयांची वसुलीकरण्यात आली. राज्य वीज वितरण कंपनीच्या २११ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे निकाली निघाली असुन त्यातुन ६४,००० रुपयांची वसुली करण्यात आली. बीएसएनएल च्या १०२ प्रकरणापैकी १० प्रकरणे निकाली निघाली असून त्यातुन २२,४५२ रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण २४९ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातुन २०,९१,३४३ रुपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रुपाने वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतच्या पॅनेलवर न्यायाधीश न. के. वाळके, अ‍ॅड. के. जी. रामटेके, आर. एम. अंबादे (समाजसेवक) यांनी काम पाहिले. तालुका वकील संघाचे अधिवक्ता, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, महा. राज्य विज वितरण कंपनीचे, नगर परिषदेचे कर्मचारी, बिएसएनएल चे कर्मचारी, जे. टी. रामटेके, पी. एल.व्ही., एल.ए. मल्लानी, पी.एल.व्ही. तसेच न्यायालयीन कर्मचारी जी. के. उपासे, मानकर, एस.एस. निनावे, विनोद भेदे, एस.एस. शामकुवर, आर. एस. खेताडे, एस.एन. मुगलमारे, एन. जी. रहांगडाले, पी. सी. मेश्राम, डी. के. गौर, आर. पी. वाघमारे, गणविर यांनी सहकार्य केले.