शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

२४ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

ठळक मुद्देनवीन रुग्ण नाही : क्रियाशील रुग्ण १७, रविवारी ६ व्यक्ती परतले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत २४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल रविवार ७ जून रोजी प्राप्त झाला असून एकही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह नाही. तर रविवारी ६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ४१ इतकी असून यामध्ये क्रियाशील रुग्ण १७ आहेत तर २४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.आतापर्यंत २३८५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत ४१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २१९८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १४६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.रविवार ७ जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये २३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३५४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३१७ भरती आहेत. १७३६ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.११ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाईनपुणे, मुंबई व इतर राज्यातून ४०६९६ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून २९४३३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या ११२६३ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या