शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

233 केंद्रांना परवानगी मात्र धान खरेदीचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 22:55 IST

दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर गुरुवारी मागील हंगामात काम करणाऱ्या १८३ व नवीन ५० अश्या जिल्ह्यात एकूण २३३ संस्थांना धान खरेदी व नाेंदणीची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली  आहे. मात्र अद्यापही धान खरेदीचा पत्ता नाही. परिणामी शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दारात जावे लागत आहे. ऑनलाइन नाेंदणीची मुदत ३० नाेव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा प्रत्यक्ष धान खरेदी केव्हा सुरू हाेणार याकडे लागले आहे.दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर गुरुवारी मागील हंगामात काम करणाऱ्या १८३ व नवीन ५० अश्या जिल्ह्यात एकूण २३३ संस्थांना धान खरेदी व नाेंदणीची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अद्याप धान खरेदी सुरू झाली नाही. शेतकरी अडचणीमुळे आपला धान १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांना धान विकत आहे. यात शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ६०० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. प्रत्यक्ष धान खरेदी केव्हा सुरू हाेईल, हे मात्र निश्चित कुणीही सांगत नाही.शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र सुरु हाेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. मात्र सध्यातरी एकाही केंद्रावर खरेदी सुरु झालेली नाही.

 २० केंद्रांची मान्यता रद्द - धान खरेदीमध्ये माेठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितेचा प्रकार उघडकीस आला हाेता. अवघ्या सहा तासात सहा लाख क्विंटल धान खरेदीचा विक्रम केंद्रांवर करण्यात आला हाेता. या प्रकाराची चाैकशी करण्यात आली. त्यातील आता २० केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली असून अशा संस्थांना प्रत्येकी २० लाख रुपये दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची पूर्तता केल्यास संबंधित धान खरेदी सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

नाेंदणीसाठी ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ- आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाेंदणीची अंतिम मुदत १० नाेव्हेंबर हाेती. गुरुवारपर्यंत ७१ हजार शेतकऱ्यांनी नाेंदणी झाली हाेती. तब्बल दाेन लाख २३ हजार १०१ शेतकरी धान उत्पादक आहेत. अद्यापही माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नाेंदणी व्हायची आहे. त्यामुळे आता नाेंदणीला ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन नाेंदणीसाठी ॲपही विकसित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड