शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

लाखांदुरात २२५ क्विंटल धान्य घोटाळा

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता.

कारवाईची मागणी : बेमुदत उपोषणलाखांदूर : तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सव्वादोनशे क्विंटल धान्य अपहार झाला होता. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी ७ डिसेंबरपासून दुर्गाभैय्या राठोड यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.तहसील कार्यालयाअंतर्गत सन २०१२-१३ जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत अळीच लक्ष रूपये किमतीचे दोनशे क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचे उघड झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दोषींना पाठिशी घातले. यामुळे दुर्गाभैया राठोड यांनी तहसीलदार, धान्य खरेदी निरीक्षक यांना निलंबीत करण्याची मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकीशी केली असता त्यात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसा अभिप्राय असताना कार्यवाही थंडबस्तात ठेवण्यात आल्याचा आरोप करून राठोड यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.मात्र यासंबंधाने येथील स्वस्त धान्य दुकानदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मंदा ढोरे, केशव चुटे, संघमित्रा लांडगे, गुलाब गभणे, विलास हुमणे यांनी आपली बाजू मांडून धान्य निरीक्षकावर आरोप केले. यात गोदामपाल गडपायले यांनी धान्याची अफरातफर केली असून त्याचा आळ दुकानदारांवर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. गोदामातील रजिस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये दुकानदारांनी धान्य उचलल्याबद्दल सह्या रजिस्टरला दिसून आल्या नाही व काही ठिकाणी राजकुमार गडपायले यांनी खोट्या सह्या करून सदर धानाची परस्पर अपरातफर केल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे.तहसीलदार यांचेकडून धान्य मंजूर करण्यात आले नसताना खोटे चालान तयार करून ते चालकाचे पैसे गोदामपलकाने दुकानदारांच्या नावात स्वत:च बँकेत भरल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदामपाल गडपायले याने अधिकारी व दुकानदारांची फसवणूक केल्याचे लेखी स्वस्त धान्य दुकानदारांनी म्हटले आहे. मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)