शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

२२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार

By admin | Updated: April 30, 2017 00:22 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

नाना पटोले : विद्युत व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार कटीबद्धभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था बळकट करण्याकरीता केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. विद्युत व्यवस्थेचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. कमी-अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणे बंद पडत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या मध्यभागी साकोली किंवा सौंदड येथे २२० केव्हीचे उपकेंद्र बनविण्यात येणार असून याकरीता ३० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्याचे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित होते. यावेळी खा.नाना पटोले म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्ट्रक्चर ऊभारले जाणार आहे. यासाठी महावितरणच्या दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पुढील ५० वर्षात नागरिकांना वीज पुरवठ्यसंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये याकरीता केंद्र सरकारच्या दीनदयाल उपाध्याय विद्युत बळकटीकरण योजनेंतर्गत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४,५०० कोटीची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.वादळ, वारा, पावसामुळे विद्युत खांबावरील वीज तारांच्या एकमेकांचा स्पर्श होवून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्याकरीता भंडारा, तुमसर व पवनी येथील भूमिगत वीज तारांचे जाळे पसरविण्यात येणार असून उर्वरीत शहरांचा यात समावेश करण्यात येणार आहे. आयपीडीसी योजनेंतर्गत निवडक कार्यालयामध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून तो प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करून वीज बचतीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषि पंपाची मागणी असून मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व कृषिपंपाच्या जोडण्या पूर्ण झाल्याचे सांगत कृषी पंपाची थकबाकी ८० कोटीच्या जवळपास असल्याचे सांगितले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची शेती होत असून या पिकाला पाण्याची आवश्यकता असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्याने पाण्याची पातळी खालावल्याने आज जिल्ह्यातील ४० गावे रेड झोनमध्ये असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)