लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कत्तलीसाठी कंटेनरमधून अवैधरित्या नेणाºया २२ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे केली. या प्रकरणी तिघांना अटक करून ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुजीब मन्नी काजी (२०), जफर मंजूर काजी (४०) दोघेही राहणार धोंडाराई ता.देवराई जि.बीड आणि कामगार संदीप कपूरचंद मोहबे (२२) रा.कुंभारटोली आमगाव जि. गोंदिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गत काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर होणाºया जनावर वाहतुकीला पोलिसांनी आळा घातला. मात्र नवीन नवीन क्लृप्त्या योजून ही वाहतूक होत आहे. आता बंदीस्त कंटेनरमधून वाहतूक होत असल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवारी रात्री कारधा टी पॉइंटवर सापळा रचण्यात आला. कंटेनर (क्रमांक युपी १४ एफआय ९७२५) ची तपासणी केली. तेव्हा त्यात २२ जनावरे दाटीवाटीने कोंबून असल्याचे पुढे आले. या जनावरांची किंमत ३ लाख २१ हजार रुपये असून कंटेनरची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून कंटेनर जप्त करण्यात आला. तर जनावरांची रवानगी गोधन सुकृत गोशाळा खैरी पिंपळगाव येथे करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे रवींद्र मानकर, कारधाचे ठाणेदार जी.आर. कंकाळे यांनी केली.
कत्तलीसाठी कंटेनरमधून जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:20 IST
कत्तलीसाठी कंटेनरमधून अवैधरित्या नेणाºया २२ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे केली. या प्रकरणी तिघांना अटक करून ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कत्तलीसाठी कंटेनरमधून जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका
ठळक मुद्देतिघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखा व कारधा पोलिसांची कारवाई