शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीमुळे २१ वी पशुगणना तात्पुरती स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:26 IST

Bhandara : २५ नोव्हेंबरनंतर मोबाइल अॅपद्वारे होणार पशुंची गणना

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा जिल्ह्यात ४ नोव्हेंबरपासून २१ व्या पशुगणनेला प्रारंभ होणार होता. त्यासाठी प्रगणकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते; परंतु विधानसभा निवडणुकांमुळे पशुगणना स्थगित करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर २१ व्या पशुधन गणनेला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जगन्नाथ देशेट्टीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

यावर्षी होणारी पशुगणना मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन होणार आहे. जिल्ह्यातील २१९ प्रकारच्या पशुधनाची गणना करता येईल. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी तीन हजार घरांमागे एका पदवीधारक प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील पशुधनाची वस्तुस्थिती प्रथमच पुढे येणार आहे. केंद्र शासनाने यासंदर्भात राज्याला निर्देश जारी केले. 

सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने २१ व्या पशुगणनेशी संबंधित कामांना स्थगिती देण्यात आली. मात्र, ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण कशी करावी, याबाबतच गाइडलाइन जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. 

अचूक माहिती संकलित होणारघरांमागे एक प्रगणक याप्रमाणे प्रगणकांची नियुक्ती केली जाणार आहे. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. प्रगणक प्रत्येक घरी जाऊन या विकसित मोबाइल अॅपद्वारे प्रगणक गणना करतील. प्रगणक व निरीक्षकांच्या माध्यमातून गणना अचूक, शास्त्रीय पद्धतीने होण्यास प्राधान्य असेल.

आकडेवारी विविध नियोजनासाठी गरजेची मोहिमेसाठी पदवीधारकांना प्रगणक म्हणून नेमले जाईल. शासकीय योजना आणि प्रकल्प, दुधाचे उत्पादन, दुधाच्या कमी- जास्त होणाऱ्या किमती, राज्यातील एकूण पशुधन आणि त्याचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी पशुगणना महत्त्वाची असते. दर पाच वर्षांनी ही पशुधनाची गणना होते.

प्राण्यांची वर्गवारी, जात व छायाचित्रासह यंदा मोबाइलमधील अॅपद्वारे गणना होणार आहे. प्राण्यांची वर्गवारी, जात यासंदर्भातील छायाचित्रासह माहिती अॅपमध्ये असणार आहे. पाळीव कुत्रे, भटके कुत्र्यांची माहिती नोंदवली जाणार आहे. दूध डेअरी, मटण व चिकन विक्रीच्या दुकानांसह त्यांच्याकडील माहितीची नोंद होणार आहे. त्यासाठी राज्य पशुगणना अधिकारी व जिल्हा पशुगणना अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारची सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा