१०० कुटुंबाचा विमा : सेवक कारेमोरे यांचे प्रतिपादनवरठी : सहकार क्षेत्रातील यश हे ग्राहकाच्या विश्वासाचे प्रतिक आहे. त्यांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी संस्थेची. प्रत्येक सभासदांना आर्थिक सुरक्षा पुरवण्याची क्षमता नियमात तोडकी आहे. म्हणून संत जगनाडे महाराज ग्रामीण सहकारी पत संस्थेच्या दोन हजार १०० सदस्यांना आर्थिक सुरक्षा म्हणून प्रत्येकाचे जनधन योजने अंतर्गत विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सेवक कारेमोरे यांनी दिली.श्री संत जगनाडे महाराज ग्रामीण सहकारी पत संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सेवक कारेमोरे यांच्या अध्यक्षतेत झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष एकानंद समरीत संचालक रेवाराम गायधने, बाळु बारइृ, नारायण हटवार, रविंद्र येळणे, अरुण डोकरीमारे, दयाल बन्सोड, रंजित कारेमोरे, वैशाली साठवणे, मनोहर बालपांडे व बाबुराव साठवणे उपस्थित होते. पत संस्थेच्या दोन हजार १०० सभासदाचे वार्षिक विमा व दरवर्षी १०० कुटुंबाचे आजीवन विमा संस्थेच्या मार्फत काढण्यात येणार आहे. पत संस्थेमार्फत सभासदाना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण कवी विष्णूपंत चोपकर यांच्या सुचनेनुसार यावर्षी पासून परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लवकरच संत जगनाडे महाराज ग्रामीण सहकारी पत संस्थेत विद्युत बिल संकलन केंद्र सुरू होणार आहे. तालुक्यातील सर्व शाखाचे संगणीकरण झाले आहे. संचालन व आभार व्यवस्थापक एम.एल. नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमास शरद साकुरे, रमेश भुरे, शोभा बाळबुधे, संदीप लेंडे, रोशन वाघमारे, कमलेश वैद्य, गुरूप्रसाद सेलोकर, मुनीलाल रहांगडाले, रमेश चिनकुरे, श्रीधर बडवाईक, गिरधारी ठोंबरे, वनिता कारेमोरे, राजेंद्र बोरकर, सतीश लेंडे, महेश गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. (वार्ताहर)
२,१०० सभासदांचे विमा काढणार
By admin | Updated: October 1, 2015 00:51 IST