साकोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द प्रकल्पाला भेट देवून आश्वासनाची खैरात वाटली. त्याचप्रमाणे निम्नचुलबंद प्रकल्पालाही निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी आहे. २० वर्षे झाली तरी ना प्रकल्प पुर्ण झाला ना सिंचनासाठी ना पिण्यासाठी पाण्याची सोय झालेली नाही. साकोली पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली येथे निम्नचुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाला २९ एप्रिल १९९५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. मान्यता मिळताच मोठ्या थाटात या प्रकल्पाचे भुमिपूजन करण्यात आले. यात नदीच्या दोन्ही तिरावर मातीचे धरण व नदीचे पात्रात १०८ मि. लांबीचे धरण बांधुन त्यात १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले. या धरणापासून साकोली तालुक्यातील कुंभली, सुकळी, महालगाव, शिवणीबांध, साखरा, वटेटेकर, सासरा, न्याहारवानी, कटंगधरा, विहिरगांव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोदरा या २३ गावातील ५ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या घटणातून साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गांवाना शुध्द पाणी पुरवठा होणार असे प्रस्तावित आहे.मागील वीस वर्षाच्या कालावधीत दरवेळी या धरणाच्या नावावर राजकारण करीत अनेकानी मते मागितली. अनेक मंत्री येऊन गेले मात्र या प्रकल्पाचे काम अजुनही अपुर्ण असून प्रकल्पाचे पानी सिंचनासाठी तर मिळालच नाही उलट पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही. तर ज्या शेतकऱ्यांची शेती या धरणात गेली त्या शेतकऱ्यांना शेतीचा मोबदलाही मिळालेला नाही, हे येथे उल्लेखनीय (तालुका प्रतिनिधी)
२० वर्षांपासून चुलबंद प्रकल्प अपूर्ण
By admin | Updated: August 19, 2015 01:05 IST