शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देदहा कोटींची मागणी : हेक्टरी ८ हजारांचा मदत ठरणार तुटपुंजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला असून प्रशासनाच्या संयुक्त सर्वेक्षणात केवळ ८ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने घोषित केलेली हेक्टरी ८ हजाराची मदत अगदी तुटपुंजी ठरणार आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा रबी हंगामासाठी सावकाराचा दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतात उभा असलेला धान आणि कापणी झालेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतात धान आडवा झाला होता. तर कडप्याला अंकुर फुटले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती.दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसान जिल्हा केवळ ८ हजार ८०६ हेक्टर धान पिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यातही कोरडवाहू २७०९ हेक्टर आणि बागायती ६०९७ हेक्टर नुकसान झाल्याचे या अहवालात नमुद आहे.राजकीय अस्थिरतेमुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत घोषित केले.यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र आता हेक्टरी आठ हजार मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.लाखनी, लाखांदूर, साकोली या तीन तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु या शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याची कोणतीही आशा नाही. पीक विमा काढलेले शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहे. परंतु जाचक अटींमुळे मदत पुरेशी मिळण्याची शक्यता नाही. खरीपाचा हंगाम हातचा गेला. आता रबी हंगाम तोंडावर आहे. मात्र अनेक शेतकºयांजवळ रबी हंगामासाठी पैसेच नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.सरसकट मदतीची अपेक्षाबियाणे आणि मशागतीच्या दरासोबत मजुरीचे दरही वाढले आहे. एकेक कर धान पिकाचा साधारण खर्च २५ हजाराच्या घरात जातो. शासनाने केलेली मदत हेक्टरी असून यामुळे शेतकºयांच्या हाती काहीही उरण्याची शक्यता नाही. गत अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्यां शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. परंतु शासनाने हेक्टर आठ हजार रुपये मदत घोषित करुन शेतकऱ्यांचा तोंडाला पाने फुसली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत संताप दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेती