अंमलबजावणी होणार : ३५ गुण घेणारा अनुत्तीर्ण पुरुषोत्तम डोमळे सानगडीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १० वी व १२ वींच्या लेखी परिक्षेत विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेत २० टक्के गुण अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय मार्च १६ च्या परिक्षेपासून लागु होणार आहे. सध्या दहावीची तोडी परिक्षा २० गुणाची व लेखी परिक्षा ८० गुणांची घेण्यात येते. इयत्ता १२ वीला तोंडी ३० गुणाची आणि लेखी ७० गुणांची लेखी परिक्षा असते. आतापर्यंत तोंडी परिक्षेत भक्कम गुण मिळल्यानंतर ८० पैकी लेखी परिक्षेत १५ गुण मिळाले तरी एकुण बेरीज ३५ होत असे व विद्यार्थी उत्तीर्ण होत होता. मात्र आता या नविन निर्णयामुळे विद्यार्थ्याला तोंडी परिक्षेत ८० पैकी २० टक्के गुण घेणे अनिवार्य केले गेले असल्यामुळे लेखी परिक्षेत १६ गुण मिळविल्या शिवाय तो उत्तीर्ण होणार नाही. म्हणजेच १०० पैकी ३६ गुण घेतल्यास विद्यार्थी पास होणार व ३५ गुण घेणारा विद्यार्थी नापास होणार. १२ वींच्या परिक्षेलाही लेखी परिक्षेत २० टक्के गुण अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण मंडळामार्फत हा निर्णय काही दिवसापासून मान्य करण्याचा हालचाली सुरु होत्या. अखेर परिक्षा पध्दतीत नव्या बदलात मंजुरी मिळाली आहे. मार्च १६ च्या परिक्षेपासून हा निर्णय लागु केला जाणार आहे.
लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य
By admin | Updated: April 25, 2015 00:42 IST