शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 3, 2024 12:49 IST

Bhandara : पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळेत गेलेल्या एका पहिलीतील विद्यार्थिनीला शाळेतीलच स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे) असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे. 

यशस्वी हिने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता. १ जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या. यशस्वी पहिल्या दिवसापासून शाळेत नियमित हजर होती. बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली होती. शाळेत गेल्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली असता तिथे पडलेल्या सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या ताराला तिचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. अन्य विद्यार्थीनी या स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळून आली. विद्यार्थीनींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी  तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शाळेत विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहती गावात पसरताच अनेकांनी गर्दी केली. आपली मुले सुरक्षित आहेत का, याची अनेक पालक चौकशी करताना दिसले. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यशस्वीच्या पालकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. 

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी आरंभली आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या मशिनचा विद्युत पुरवठा सदोष होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा