लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असून गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. प्रकल्पीय एकूण पाणी साठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय जीवंत उपयुक्त साठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारी या जलाशयाची पातळी २४३.८० मीटर नोंदविण्यात आली असून उपयुक्त पाणीसाठा ४०९.४१ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.३१ आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात २८८ मीमी पावसाची आतापर्यंत नोंद करण्यात आली. धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ८० हजार ८४२.७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढभंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे २४३.८२ मीटर पाणी पातळी मोजण्यात आली. ६ हजार २२८.४४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कारधा येथे धोकापातळी २४५.५० मीटर असून इशारा पातळी २४५ मीटर आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ गेट अर्ध्या मीटरने उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:58 IST
पवनी तालुक्यातील इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प अर्थात गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ गेट अर्ध्या मीटरने उघडले
ठळक मुद्दे८० हजार क्युसेस विसर्गनदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा