शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापूराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रशासन सतर्क झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पात शनिवारी सकाळी ७ वाजता २४३.१३० मीटर पाणीपातळी होती. त्यावेळी २३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून २६७९.८२२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

ठळक मुद्दे२२४९ क्यूमेक्स विसर्ग : नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे शुक्रवारी सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी यातील दहा दरवाजे बंद करण्यात आले असून सध्या १९ दरवाज्यातून २२४९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग हाेत आहे. परंतु सायंकाळपर्यंत या धरणातून पाच हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरणाचे पाणलोट क्षेत्रासह मध्यप्रदेशात दमदार पाऊस सुरु आहे. गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापूराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रशासन सतर्क झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पात शनिवारी सकाळी ७ वाजता २४३.१३० मीटर पाणीपातळी होती. त्यावेळी २३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून २६७९.८२२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. दिवसभर पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सायंकाळी ५ वाजता धरणाचे १९ दरवाजे उघडे हाेते. त्यातून २२४९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु हाेता. वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

धरणाची पाणी पातळी २४३.१०० मीटर- पवनी तालुक्यातील गाेसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढत आहे. प्रकल्पाची शनिवारी २४३.१०० मीटर पाणी पातळी हाेती. धरणातील पाण्याची पातळी राखण्यासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आगामी काही काळात पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेणार आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर