शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

जिल्ह्यात १७ हजार लाडक्या बहिणी ठरल्या लाभास अपात्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:28 IST

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना : अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही.

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची ७मार्चपूर्वीच फेरतपासणी पूर्ण झालेली आहे. या तपासणीत जिल्ह्यातील १७हजार १८३ लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. सत्तेत बसलेल्या भावाने निवडणूक जिंकण्यासाठी आपली फसवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे.

योजनसाठी अपात्र झालेल्यांकडून यापूर्वी दिलेली अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही. मात्र, त्यांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून सुमारे २ लाख ९९ हजार ८७१ महिलांनी प्रस्तावाची नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ८२ हजार ७८८ महिला 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आल्या. विधानसभा निवडणुका आटोपून नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व प्रस्तावांची जिल्ह्यातील सातही तालुकास्तरीय समितीकडून फेरतपासणी सुरू करण्यात आली होती.

८ मार्चला १ हजार ५०० रुपयांचे वितरणनिकषात न बसणाऱ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिमाह १५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. अपात्र ठरलेल्या १७ हजार १८३ लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्याची माहिती आहे.

निवडणुकांपूर्वी पात्र, आता केले अपात्रविधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिण योजना अंमलात आणली गेली. वारेमाप प्रचार व प्रसार करून महिलांची मते मिळविण्यात आली. मात्र, सत्ता मिळताच चारचाकी वाहन, नोकरीवर असलेले, आयकर भरणारे व दुसऱ्या राज्यात गेलेल्यांचे अर्ज अपात्र करण्याचे निर्देश देण्यात आले.

१४ महिलांनी स्वतःहून लाभ सोडलाजिल्ह्यात आतापर्यंत १४ महिलांनी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र या महिलांनी स्वतःहून माघार घेत योजनेचा लाभ नाकारला असल्याचे लेखी पत्र संबंधित तालुक्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केले. 

१००% अर्जाची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणीतालुकास्तरीय समितींच्या तपासणीत १७ हजार १८३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव अपात्र (रिजेक्ट) ठरविण्यात आले आहे. तर २.८२ लाख अर्ज मंजूर झाले.तालुका निहाय लाभार्थीतालुका                   पात्र                   अपात्र    भंडारा                  ६१,४९७                 ३,१३३लाखनी                 २९,१५०                 २,२६२लाखांदूर                ३१,७९७                २,१७६मोहाडी                 ३२,७४२                 १,८७०पवनी                   ३६,३२२                  २,७९९साकोली               ३४,३३०                   २,३७९तुमसर                 ५५,९५०                  २,५६४एकूण                 २,८२,७८८               १७,१८३

घोषणाचे २१०० रुपयांचा लाभ केव्हा मिळणार?

  • लाडकी बहिणी योजनेत १ प्रारंभापासून दीड हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीदरम्यान २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती.
  • परंतु, सत्ता मिळून अद्यापही लाभदेण्यात आलेला नाही. त्यामुळे दरमहा २१०० रुपयांचा लाभ केव्हा मिळणार, हा प्रश्न सतावतो आहे.
  • सर्वाधिक पात्र लाभार्थी भंडारा तालुक्यातील असून यांची संख्या ६१ हजार ४९७ इतकी आहे. तर सर्वात कमी पात्र लाभार्थ्यांची संख्या लाखनी तालुक्यातील आहे. पात्र लाभार्थ्यांमध्ये २९ हजार १५० लाडक्या बहिनींचा समावेश आहे.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाbhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना