शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

१७ लाख ५९,९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:32 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार २८ मे २०१८ रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्देचोख बंदोबस्त : मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार २८ मे २०१८ रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१४९ मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ४७२८ बॅलेट युनिट, २३६६ कंट्रोल युनिट व २७२४ व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे. या निवडणूकीत राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष व अपक्ष मिळून १८ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक खर्च नोडल अधिकारी अशोक मातकर, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम व अधिकारी उपस्थित होते.भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात १२१० मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६६५५ अधिकारी कर्मचारी, १९०९ पोलीस कर्मचारी व ५ तुकडया अतिरिक्त पोलीस बल नेमण्यात आले आहे. गोंदिया जिल्हयासाठी ९३९ मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून ५१३५ अधिकारी कर्मचारी, १९२४ पोलीस कर्मचारी व १४ अतिरिक्त पोलीस दल तुकडया नेमण्यात आल्या आहेत. या सोबतच भंडारा-गोंदिया जिल्हयात असलेल्या २१४९ मतदान केंद्रावर अनुक्रमे १४० व १०३ असे एकूण २४३ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.आचार संहिता लागल्यापासून दोन्ही जिल्हयात आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान भंडारा जिल्हयात अवैद्य दारु वाहतुकीच्या १६६ प्रकरणात १२ हजार २६१ लिटर मद्य व गोंदिया जिल्हयात २१० प्रकरणात ११९४ लिटर असे एकूण ३७६ प्रकरणात १३ हजार ४५५ लिटर अवैद्य दारु जप्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे भंडारा जिल्हयात ८ लाख २५ हजार रोख जप्त करण्यात आली आहे.मतमोजणी ३१ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल लागणार आहेत. यासाठी एकूण 84 सुक्ष्म निरिक्षक, ९६ मतमोजणी पर्यवेक्षक व ९६ मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टॅबुलेशन पथक व सिलींग पथक यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीनंतर ईश्वरचिठ्ठीच्या आधारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रातील व्हिव्हिपॅटची मते मोजण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.