शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फ्लावर समझे क्या... १५० किलो का ‘पुष्पा’ है मै!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 18:17 IST

ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे.

साकोली (भंडारा) : शीर्षक वाचून अचंबित होऊ नका, कारण हा 'पुष्पा' खरच १५० किलो वजनाचा आहे. सध्या जिल्हाभरात त्याचीच चर्चा होतेय. 

साकोली तालुक्यातील येथील चांदोरी येथे तब्बल दीडशे किलो वजन असलेल्या बोकडाचे नाव ‘पुष्पा’ आहे. चांदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य देवा हातझाडे यांच्याकडे २५ महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तब्बल दीडशे किलो वजनाचा हा बोकड ५ फूट उंच व पाच फूट लांब आहे. त्याला बघितल्यांवर भल्याभल्यांचा थरकाप उडतो.

या बोकडाची अंगकाठी बघता, जिल्ह्यात इतक्या मोठ्या वजनाचा तो एकमेव बोकड असल्याचे समजते. ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे.

‘पुष्पा’ खातो तरी काय?

याला रोज खायला कुडवाभर तांदूळ व कुडवाभर गहू लागतो. रोज फिरल्यानंतर मसाज केला जातो. पुष्पा जर घराबाहेर निघून रस्त्याने चालू लागला तर त्याची अंगकाठी पाहून चांगले-चांगले घाबरतात. त्याचा हा रुबाब पाहता, पुष्पा नामक साउथ चित्रपटाच्या अल्लू अर्जुनप्रमाणे त्याचाही दरारा पाहायला मिळत आहे.

आता त्याची चर्चा आता पंचक्रोशीत पसरली असून, हैदराबादच्या व्यापाऱ्यांची एकच झुंबड या पुष्पाला खरेदी करण्यासाठी चांदोरी गावात लागलेली आहे. ‘पुष्पा’चा तोरा बघता त्याच्या मालकाने त्याची किंमत २ लाख रुपये ठेवली आहे. व्यापाऱ्यांनी लावलेली बोली लक्षात घेता मालक देवा हातझाडे हे ‘झुकेगा नहीं’ म्हणत किंमत सोडायला तयार नाहीत !

टॅग्स :Socialसामाजिकsakoli-acसाकोलीPushpaपुष्पा